प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भारतीय जनता पक्षाने ( BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नेते नवीन जिंदाल यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले. या प्रकरणी दोघांविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भारत सरकारचे कौतुक केले आहे. शोएब अख्तरने ट्विटरच्या माध्यमातून आपले मत नोंदवले आहे. (Nupur Sharma Naveen Jindal Prophet Muhammad Controversy Shoaib Akhtar Tweet)
शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) म्हटले की, 'प्रेषित मुहम्मद यांचा आदर आमच्यासाठी सर्वस्व आहे. आपले जगणे, मरणे आणि आपण जे काही करतो ते फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच आहेत. परंतु प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल करण्यात आलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा मी तीव्र निषेध करतो. अशाप्रकारे लज्जास्पद वक्तव्य करणाऱ्यांना निलंबित करण्याच्या भारत (India) सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. भारत सरकारने अशा लोकांवर कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजीही घ्यावी.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.