"No coach in the world can produce an artist like Mohammed Shami, he is his own what he is," Paras Mhambre:
कोणताही प्रशिक्षक शमीसारखा कलाकार घडवू शकत नाही, असे वक्तव्य भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांनी केले आहे.
ते, म्हणाले मोहम्मद शमीमध्ये प्रत्येक वेळी चेंडू थेट सीममध्ये टाकण्याची दुर्मिळ प्रतिभा आहे आणि जगातील कोणताही प्रशिक्षक असा वेगवान गोलंदाज तयार करू शकत नाही.
एकदिवसीय विश्वचषकातील सात सामन्यांमध्ये सर्वाधित 24 विकेट्स घेणारा शमी सध्या वनडे आणि कसोटीत भारताचा सर्वोत्तम गोलंदाज आहे.
मोहम्मद शमी गेल्या काही वर्षांत जे यश मिळवले आहे त्याचे श्रेय म्हाम्ब्रे यांना घ्यायचे नाही. मोहम्मद शमीसारखे टॅलेंट असलेला गोलंदाज भारताला मिळेल का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
यावर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी ते म्हणाले, 'जगातील कोणताही प्रशिक्षक शमीसारखा गोलंदाज घडवू शकतो, असे मी म्हटले तर ते योग्य ठरणार नाही. जर एखाद्या गोलंदाजाला प्रत्येक वेळी सरळ सीममध्ये चेंडू टाकता आला तर जगातील प्रत्येक गोलंदाज शमी होईल. हे एक कौशल्य आहे जे शमीने कठोर परिश्रमातून आत्मसात केले आहे आणि त्याने स्वतःला असा गोलंदाज बनवला आहे.'
जसप्रीत बुमराहबद्दल बोलताना माजी भारतीय वेगवान गोलंदाज आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हांब्रे म्हणाले, 'बुमराहची Bowling Action देखील असामान्य आहे परंतु तो या Bowling Action इन स्विंग किंवा आऊट स्विंग करतो. ही एक कला आहे आणि या कलेमध्ये निष्णात होण्यासाठी खूप मेहनत आणि समर्पण आवश्यक आहे.''
शमी आणि बुमराह जगभरातील फलंदाजांवर वर्चस्व राखण्यात यशस्वी ठरले आहेत, ज्यामुळे म्हांबरे आश्चर्यचकित झाले आहेत. त्याच्या यशाचा अनेकांना हेवा वाटेल.
म्हाम्ब्रे पुढे म्हणाले, 'मला वाटते की कसोटी सामन्यांमध्ये आमच्याकडे बुमराह, शमी आणि इशांत (शर्मा) होते ज्यांनी अशा प्रकारची जादू निर्माण केली होती, परंतु आता तुम्ही मला विचाराल की मला अशा प्रकारचे वर्चस्व अपेक्षित होते का? मला अशा प्रकारचे वर्चस्व अपेक्षित नव्हते. या स्तरावर अशी कामगिरी करण्याचे स्वप्नातही वाटले नव्हते.'
ते म्हणाले, 'माझ्या मते श्रीलंकेला ५० धावांवर बाद करणे आणि नंतर दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाविरुद्ध 320 धावांच्या जवळपास धावा करून 80 धावांवर त्यांना बाद करणे हे स्वप्नासारखे वाटते. साहजिकच आमच्यासारख्या गोलंदाजी आक्रमणामुळे आम्हाला त्याच्याकडून चांगली कामगिरी अपेक्षित होती, पण मोठ्या मंचावर इतक्या मोठ्या कालावधीत अशी कामगिरी करणे खरोखरच कौतुकास्पद होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.