T20 Cricket Records: टी-20 सामन्यात प्रत्येक फलंदाज शानदार कामगिरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतो. अशाच एका खेळाडूने 195 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. हा सामना नेपाळ T20 लीग दरम्यान खेळला गेला. ज्या खेळाडूचा उल्लेख केला जात आहे, तो अफगाणिस्तानचा आहे. विशेष म्हणजे, त्याने 12 चेंडूत केवळ चौकार आणि षटकार लगावत 60 धावा केल्या.
नेपाळच्या (Nepal) यजमानपदी नेपाळ टी-20 लीग खेळवली जात आहे. यामध्ये अफगाणिस्तानच्या एका क्रिकेटपटूने घातक फलंदाजी केली. त्या फलंदाजाने 195 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि 12 चेंडूत 60 धावा ठोकल्या. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि तब्बल 6 षटकार मारले. विशेष म्हणजे, हा फलंदाज सीता मातेच्या माहेरच्या म्हणजेच जनकपूर संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
अफगाणिस्तानचा (Afghanistan) समिउल्ला शिनवारी नेपाळ टी-20 लीगमध्ये जनकपूर रॉयल्सकडून खेळत आहे. कीर्तिपूर येथे झालेल्या टी-20 सामन्यात त्याने विराटनगर सुपर किंग्जविरुद्ध 78 धावांची शानदार खेळी खेळली आणि नाबाद राहिला. यादरम्यान शिनवारीने 40 चेंडूंचा सामना करत 6 चौकार, 6 षटकार खेचले. त्यांच्या संघाने निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 189 धावा केल्या.
35 वर्षीय समिउल्ला शिनवारी (Samiullah Shinwari) हा अफगाणिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 84 एकदिवसीय आणि 65 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 11 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 1811 धावा केल्या आहेत, तर टी-20 मध्ये त्याने 2 अर्धशतकांसह एकूण 1013 धावा केल्या आहेत. त्याच्या एकूण टी-20 कारकिर्दीत त्याने 137 सामन्यांत एकूण 2057 धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याने एकदिवसीय सामन्यात 46 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 28 विकेट्स घेतल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.