Ravi Shastri on Dhoni and Hardik: 'धोनी गुरू आहे, तर हार्दिक शिष्य...', IPL Final पूर्वी रवी शास्त्रींचे मोठे भाष्य

रवी शास्त्री यांनी धोनीला गुरू, तर हार्दिकला शिष्य म्हणत आयपीएल २०२३ फायनलपूर्वी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Ravi Shastri | Hardik Pandya | MS Dhoni
Ravi Shastri | Hardik Pandya | MS DhoniDainik Gomantak
Published on
Updated on

Ravi Shastri on MS Dhoni and Hardik Pandya: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात पार पडला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यापूर्वी माजी प्रशिक्षक आणि सध्याचे समालोचक रवी शास्त्री यांनी एमएस धोनी आणि हार्दिक पंड्या यांच्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

शास्त्री यांनी धोनीला गुरू म्हटले आहे आणि हार्दिकला शिष्य म्हटले आहे. दरम्यान, या दोघांनीही त्यांच्या नेतृत्वाने सर्वांना प्रभावित केले आहे. धोनी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आहे आणि हार्दिक गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. या दोघांनीही आपल्या संघांना अंतिम सामन्यात पोहचवले आहे.

Ravi Shastri | Hardik Pandya | MS Dhoni
धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांनी रेल्वे स्टेशनवरच घालवली रात्र! पावसामुळे रखडलेल्या IPL Final वेळचे Video व्हायरल

त्या दोघांबद्दल स्टार स्पोर्ट्सशी बोलताना शास्त्री यांनी म्हटले आहे की 'त्यांचे स्वभाव वेगळे आहेत. एमएस धोनीकडे सातत्य आहे. तो ज्याप्रकारे नेतृत्व करतो, ज्याप्रकारे मैदानात शांत राहातो. असे वाटते की मैदानात नाहीये.'

'पण त्याचवेळी हार्दिक थोडा भडक आहे. त्यामुळे त्याने धोनीकडून जे काही शिकले आहे, ते त्याचा शांतपणा, जो त्याने नेतृत्व करताना मैदानात घेऊन आला.तो ज्याप्रकारे त्याच्या संघाला सांभाळले आहे. त्या दोघांमध्ये खुप समानता आहेत, ज्याप्रकारे ते दोघे त्यांच्या संघातील खेळाडूंनी संवाद साधतात. ते दोघेही हुशार आहे. हो नक्कीच धोनी गुरू आहे आणि हार्दिक शिष्य आहे.'

Ravi Shastri | Hardik Pandya | MS Dhoni
MS Dhoni Last Match: धोनीबाबत 2019 वर्ल्डकपचीच IPL मध्येही होणार पुनरावृत्ती? त्या घटनेने फॅन्स इमोशनल

चेन्नईला पाचवे, तर गुजरातला दुसऱ्या विजेतेपदाची आस

दरम्यान, या अंतिम सामन्यात जर चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवला, तर हे त्यांचे आयपीएलमधील पाचवे विजेतेपद असेल. तसेच गुजरातने सामना जिंकला, तर त्यांचे हे सलग दुसरे आयपीएल विजेतेपद असेल.

चेन्नईने यापूर्वी 2010, 2011, 2018 आणि 2021 या वर्षी आयपीएल विजेतेपद जिंकले आहे. तसेच गुजरातने गेल्यावर्षी पहिल्यांचा आयपीएलमध्ये खेळताना विजेतेपदाला गवसणी घातली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com