Mohammed Siraj: सिराज मियाँची ग्राउंड्समनला लाखमोलाची मदत! 'त्या' कृतीने मैदानच नाही, तर मनंही जिंकली

Asia Cup 2023 Final: मोहम्मद सिराजने आशिया चषक भारताला मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलण्याबरोबर फायनलनंतर केलेल्या कृतीने कोट्यवधी चाहत्यांची मनंही जिंकली आहेत.
Mohammed Siraj
Mohammed SirajDainik Gomantak

Mohammed Siraj donate his Man of The Match cash prize to Sri Lankan groundmen :

भारतीय क्रिकेट संघाने रविवारी आशिया चषक 2023 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. श्रीलंकेतील आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला 10 विकेट्सने पराभूत करत आठव्यांदा आशिया चषक जिंकला. भारताच्या या विजयात मोहम्मद सिराजने मोलाचा वाटा उचलला.

या सामन्यात सिराजने 7 षटकात 21 धावांत 6 विकेट्स घेतल्या, यातील ४ विकेट्स त्याने डावात्या चौथ्याच षटकात घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्विकारल्यानंतर त्याने त्याला मिळालेली बक्षीस रक्कम त्याने श्रीलंकेतील ग्राउंड्समनसाठी मदत म्हणून दिली आहे.

त्याच्या या मदतीबद्दल त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. सिराजला 5000 अमेरिकन डॉलर (भारतीय चलनानुसार साधरण 4 लाख 15 हजार रुपये) बक्षीस रक्कम मिळाली आहे.

Mohammed Siraj
W,0,W,W,4,W...! सिराजच्या वेगाने लंकेची दाणादाण, भारतीय क्रिकेट इतिहासात कोरलं सुवर्णाक्षरांनी नाव

या संपूर्ण स्पर्धेत पावसाचा मोठा व्यत्यय आला होता. या स्पर्धेतील 13 पैकी 4 सामने पाकिस्तानमध्ये, तर 9 सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते. श्रीलंकेतील 9 सामन्यांपैकी 3 सामने कँडीमध्ये, 6 सामने कोलंबोत पार पडले. दरम्यान, श्रीलंकेत सामने खेळवताना पावसाचा मोठा अडथळा होता. अनेक सामन्यात हा अडथळा आला.

भारत आणि पाकिस्तान संघातील साखळी फेरीतील सामना पावसामुळेच रद्द झाला होता, तर याच दोन संघातील सामन्याचा निकाल पावसामुळे राखीव दिवशी लागला होता. याशिवाय देखील अनेक सामन्यांमध्ये पावसाचा व्यत्यय आला. अगदी अंतिम सामन्याला सुरुवात होण्यासाठी पावसामुळे पाऊणतास उशीर झाला होता.

त्यामुळे या संपूर्ण स्पर्धेतच श्रीलंकेतील सामन्यांदरम्यान ग्राउंड्समनला सावध राहावे लागले, तसेच बऱ्याचदा पावसानंतर मेहनत घेऊन सामन्यासाठी मैदान तयार करावे लागेल. याच गोष्टींचा विचार करून सिराजने ही मदत दिली आहे. त्याने पुरस्कार स्विकारल्यानंतर तो म्हणाला, 'बक्षीसाची रक्कम ग्राउंड्समनसाठी आहे. त्यांच्याशिवाय ही स्पर्धा पूर्ण होऊ शकली नसती.'

Mohammed Siraj
Asia Cup 2023: भारत आठव्यांदा आशियाई चॅम्पियन! श्रीलंकेचा 10 विकेट्सने फायनलमध्ये उडवला धुव्वा

यापूर्वी आशियाई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष जय शाह आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही कँडी आणि कोलंबोमधील ग्राउंड स्टाफसाठी 50,000 अमेरिकन डॉलर्सच्या बक्षीसाची घोषणा केली होती. त्यांनीही ही घोषणा करताना ग्राउंड स्टाफने घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले होते.

दरम्यान, अंतिम सामन्यात श्रीलंकेचा संघ 15.2 षटकातच अवघ्या 50 धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर 6.1 षटकात भारताने 51 धावांचे आव्हान एकही विकेट न गमावता पूर्ण केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com