श्रीकांत, हरभजन म्हणतात 'Let's Do It तिबारा', क्रिकेट विश्वचषकाचे दमदार अँथम लाँच; Watch

क्रिकेट विश्वचषकाच्या शर्यतीत भारताला प्रबळ दावेदार मानले जात आहे.
Let's Do It tibara Cricket Anthem
Let's Do It tibara Cricket AnthemDainik Gomantak
Published on
Updated on

Let's Do It Cricket Anthem Video: भारतात सध्या क्रिकेट विश्वचषकाची धूम सुरु आहे. विश्वचषकाच्या शर्यतीत भारताला प्रबळ दावेदार मानले जात आहे. 1983 आणि 2011 नंतर भारत तिसऱ्यांदा विश्वचषक नावावर करेल अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहे.

क्रिकेटच्या या उत्सवाचा आनंद वाढवण्यासाठी पूनावाला फिनकॉर्पच्या वतीने बहुप्रतिक्षित क्रिकेट अँथम लाँच केले आहे.

रिपब्लिक मीडिया नेटवर्कवर हे क्रिकेट अँथम लाँच करण्यात आले आहे. 'लेट्स डू इट तिबारा' असे या गीताचे बोल आहेत. यात माजी क्रिकेटपटू एस. श्रीकांत आणि फिरकीपटू हरभजन सिंह गाण्यावर नाचताना दिसतायेत.

1983 च्या विश्वचषक विजयी संघात श्रीकांत होते तर 2011 च्या विश्वचषक संघाचा हरभजन सिंहने मोलाची कामगिरी केली होती. 2023 चा विश्वचषक भारतात होत असताना संघ तिसऱ्यांदा ही कामगिरी करेल असा विश्वास सबंध भारतीय आणि जाणकर व्यक्त करत आहेत.

पूनावाला फिनकॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक अभय भुतडा यांनी गाण्याबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'क्रिकेट सॉन्ग ऑफ द इयर Do It Tibara रिलीज करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. भारत हे एक क्रिकेटप्रेमी राष्ट्र आहे आणि हे केवळ अँथम नाही; ही एक अशी भावना आहे. क्रिकेट सीमारेषा ओलांडून 142 कोटी भारतीयांना कसे एकत्र आणून सर्वात प्रसिद्ध खेळाशी जोडते.'

रिपब्लिक मीडिया नेटवर्कवर हे गाणं लॉन्च होत असताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या सर्व प्लॅटफॉर्मवर हे क्रिकेट अँथम पोहोचवण्यासाठी सज्ज आहोत, असे रिपब्लिक मीडियाचे ग्रुप सीओओ हर्ष भंडारी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com