Rinku Singh opened up about phone call with Shah Rukh Khan: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत आत्तापर्यंत अनेक युवा खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवली आहे. तसचे या हंगामात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या खेळाडूंमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिंगचाही समावेश आहे.
रिंकूने 9 एप्रिलला झालेल्या गुजकात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात सलग पाच चेंडूत पाच षटकार ठोकत कोलकाताला विजय मिळवून दिला होता. तेव्हापासून त्याची क्रिकेटविश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, त्याच्या या खास खेळीनंतर कोलाकाता नाईट रायडर्सचा सहसंघमालक शाहरुख खानबरोबर काय चर्चा झाली, याबद्दल रिंकूने खुलासा केला आहे.
रिंकून गुजरातविरद्ध सलग 5 षटकारांसह 48 धावांची खेळी केली होती. या खेळीचे शाहरुखकडूनही कौतुक झाले. तसेच त्याने रिंकूला फोनही केला होता. याबद्दल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध सामना जिंकल्यानंतर रिंकूला समालोचकांनी प्रश्न विचारला.
त्यावर उत्तर देताना शाहरुखने सांगितले की "शाहरुख खान सरांनी मला त्या खेळीनंतर फोन केला होता. ते माझ्या लग्नाबद्दल बोलत होते. त्यांनी मला सांगितले की 'लोक मला लग्नात बोलावतात, पण मी जात नाही. पण मी तुझ्या लग्नात नाचायला येईल." रिंकूचे हे उत्तर ऐकून समालोचकही हसू लागले.
दरम्यान, शाहरुखने रिंकूचे सोशल मीडियावरही पोस्ट करत कौतुक केले होते. रिंकूच्या पाच चेंडूतील पाच षटकारांनंतर शाहरुखने ट्वीट केले होते की 'झुमे जो रिंकू! रिंकू, नितीश राणा, वेंकटेश अय्यर तुम्ही शानदार आहात. विश्वास ठेवा, इतकेच. अभिनंदन कोलकाता नाईट रायडर्स'.
9 एप्रिलला झालेल्या सामन्यात गुजरातने कोलकातासमोर 205 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला अखेरच्या 5 चेंडूंवर 28 धावांची गरज होती. यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करत असलेल्या यश दयाल विरुद्ध रिंकू सिंगने सलग 5 षटकार मारले होते. त्यामुळे कोलकाताने हा सामना सहज जिंकला होता.
रिंकू सिंग सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आयपीएल 2023 स्पर्धेत 8 सामने खेळले असून 2 अर्धशतकांसह 158.86 च्या स्ट्राईक रेटने 251 धावा केल्या आहेत. तो 4 सामन्यात नाबादही राहिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.