IPL: पंजाब किंग्जची मोठी कारवाई, अनिल कुंबळेंना मुख्य प्रशिक्षकपदावरुन हटवले

Anil Kumble: इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये पंजाब किंग्जने अनिल कुंबळेला तीन वर्षांच्या कार्यकाळानंतर मुख्य प्रशिक्षकपदावरुन हटवले आहे.
Anil Kumble
Anil KumbleDainik Gomantak

Anil Kumble: इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये पंजाब किंग्जने अनिल कुंबळेंना तीन वर्षांच्या कार्यकाळानंतर मुख्य प्रशिक्षकपदावरुन हटवले आहे. वृत्तानुसार, इयॉन मॉर्गन, ट्रेव्हर बेलिस आणि भारताचे माजी प्रशिक्षक ही भूमिका स्वीकारण्यासाठी संपर्क साधत आहेत.

पंजाब किंग्सची मोठी कारवाई

ईएसपीएन क्रिकइन्फोने एका अहवालात म्हटले आहे की, 'कुंबळेंची 2020 हंगामापूर्वी पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक आणि पुढील तीन हंगामांसाठी संघाचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, परंतु प्रीती झिंटा, उद्योगपती मोहित बर्मन, नेस वाडिया आणि करण पॉल आणि पंजाब किंग्ज सीईओ सतीश मेनन यांच्यासह मालकांच्या निर्णयानंतर त्यांना फ्रँचायझीपासून वेगळे करण्यात आले आहे.

Anil Kumble
IPL 2023: जड्डयू घेणार CSK पासून फारकत, अहवालात धक्कादायक खुलासा

पंजाब किंग्ज गुणतालिकेत तळाशी

आयपीएलच्या (IPL) तिन्ही हंगामात पंजाब किंग्ज गुणतालिकेत तळाशी राहिला. 2020 आणि 2021 मध्ये पाचव्या क्रमांकावर होता, जेव्हा लीगमध्ये आठ संघांचा समावेश होता. 2022 च्या सीझनमध्ये 10 संघ सामील झाले होते. यावेळी पंजाब सहाव्या क्रमांकावर होता.

आयपीएलमधील एकमेव भारतीय मुख्य प्रशिक्षक होते

अहवालात म्हटले आहे की, त्यावेळी संजय बांगर (2014-16), वीरेंद्र सेहवाग (2017), ब्रॅड हॉज (2018) आणि माईक हेसन (2019) यांच्यानंतर कुंबळे हे किंग्जने पाच हंगामात नियुक्त केलेले पाचवे प्रशिक्षक होते. 2022 च्या IPL सीझनमध्ये कुंबळे हे एकमेव भारतीय मुख्य प्रशिक्षक होते.

Anil Kumble
महिला IPL साठी BCCI ने बनवली खास योजना, देशांतर्गत क्रिकेटचे बदलले कॅलेंडर

पंजाब किंग्ज प्रशिक्षकाच्या शोधात आहेत

अहवालात पुढे म्हटले आहे की, फ्रेंचायझी त्यांच्या जागी दुसरा प्रशिक्षक शोधत आहे. लवकरच त्याची घोषणा केली जाईल. सोशल मीडियावरील काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, पंजाब किंग्सने (Punjab Kings) इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन आणि श्रीलंका आणि इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांच्याशी संपर्क साधला आहे.

मॉर्गन प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीत

अलीकडेच, मॉर्गनने इंग्लंडचा (England) कर्णधार म्हणून निवृत्ती घेतली आहे. बेलिसला आंतरराष्ट्रीय आणि इंडियन प्रीमियर लीग दोन्हीमध्ये चांगला अनुभव आहे. विशेष म्हणजे, त्याने 2012 आणि 2014 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सला दोनदा आयपीएल विजेतेपद मिळवून दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com