IPL 2023: बुमराहची पोकळी भरुन काढणार 'हा' गोलंदाज, संघाला जिंकून देणार किताब?

IPL 2023 Jasprit Bumrah: टीम इंडियातून बाहेर पडणारा जसप्रीत बुमराह आयपीएलचा संपूर्ण हंगाम खेळू शकणार नाही.
Mumbai Indians
Mumbai IndiansDainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2023 Jasprit Bumrah: टीम इंडियातून बाहेर पडणारा जसप्रीत बुमराह आयपीएलचा संपूर्ण हंगाम खेळू शकणार नाही. बुमराहला अद्याप पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरता आलेला नाही.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतूनही तो बाहेर आहे. याच पाश्वभूमीवर, एक धोकादायक वेगवान गोलंदाज आयपीएल 2023 मध्ये त्याची जागा भरुन काढू शकतो. हा गोलंदाज त्याच्या वेगासाठीही ओळखला जातो.

बुमराहची पोकळी भरुन काढणार हा गोलंदाज

जसप्रीत बुमराहच्या दुखापतीनंतर, मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आशा असेल की, जोफ्रा आर्चर त्याच्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये राहील, जेणेकरुन विक्रमी पाच वेळचा चॅम्पियन संघ गेल्या हंगामातील खराब कामगिरी मागे टाकून विजेतेपदासाठी मजबूत दावा सादर करु शकेल.

Mumbai Indians
IPL 2023 च्या ट्रॉफीवर गुजराज टायटन्स पुन्हा कोरणार नाव, 'हे' आहे मोठे कारण

दरम्यान, मुंबई इंडियन्स संघ 2022 मध्ये 14 सामन्यांत चार विजय मिळवून शेवटच्या स्थानावर होता. आयपीएलच्या (IPL) 15 हंगामात संघ प्रथमच शेवटच्या स्थानावर राहिला. मुंबईच्या खराब कामगिरीमुळे त्यांच्या कर्णधाराचाही आतापर्यंतचा सर्वात खराब हंगाम होता.

आयपीएलच्या इतिहासात रोहितने या मोसमात एकही अर्धशतक झळकावले नाही. यादरम्यान त्याला 19.14 च्या सरासरीने केवळ 268 धावा करता आल्या.

आयपीएल 2022 मध्ये त्याने आपली छाप सोडली

बुमराहने आयपीएल 2022 मध्ये 14 सामन्यांमध्ये 15 विकेट घेऊन आपली चमक दाखवली होती, परंतु पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो आयपीएल 2023 मध्ये खेळू शकणार नाही.

जोफ्रा आर्चरच्या आगमनाने संघाला गोलंदाजीत थोडे बळ मिळणार असले तरी बुमराहची पोकळी भरुन काढणे सोपे जाणार नाही.

संघात अनुभवी फिरकीपटूंचाही अभाव आहे. अनुभवी पियुष चावलाचा फ्रँचायझीने संघात समावेश केला आहे, पण त्याने दोन वर्षांपूर्वी शेवटचा आयपीएल सामना चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता.

Mumbai Indians
IPL 2023: किंग कोहलीबाबत एबी डिव्हिलियर्सचा मोठा खुलासा, 'तो थोडा गर्विष्ठ आणि अहंकारी...'

मुंबई इंडियन्सची कमजोरी

कर्णधार रोहित गेल्या काही काळापासून धावा करत आहे, पण चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रुपांतर करु शकला नाही.

योग्य संयोजन शोधण्याचे सर्वात मोठे आव्हान संघासमोर असेल. बुमराहची अनुपस्थिती भरुन काढणे सोपे होणार नाही. फिरकी गोलंदाजी ही देखील संघाची कमजोरी आहे.

दुसरीकडे, संघाला घरच्या मैदानाचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. गेल्या मोसमात संघाने येथे चारपैकी दोन सामने जिंकले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com