GT vs CSK
GT vs CSKDainik Gomantak

IPL 2023, GT vs CSK: हार्दिकने जिंकला टॉस! फायनलमध्ये जाण्यासाठी चेन्नई - गुजरात लढणार, पाहा Playing XI

आयपीएल 2023 स्पर्धेत पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होत आहे.

IPL 2023 Gujarat Titans vs Chennai Super Kings, Qualifier 1: मंगळवारी (23 मे) इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत प्लेऑफला सुरुवात होत असून पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होत आहे. एमए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर हा सामना होत आहे.

या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी चेन्नईने त्यांच्या संघात बदल केलेला नाही. पण गुजरातने एक बदल केला आहे. गुजरातने यश दयालऐवजी दर्शन नळकांडेला संधी दिली आहे.

GT vs CSK
IPL 2023 Playoff: प्लेऑफमधून कसे मिळणार दोन फायनालिस्ट? जाणून घ्या संपूर्ण फॉरमॅट

या सामन्यासाठी चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये डेव्हॉन कॉनवे, मोईन अली आणि महिश तिक्षणा हे परदेशी खेळाडू आहेत. तसेच गुजरातच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दसून शनका, डेव्हिड मिलर, राशिद खान आणि नूर अहमद हे परदेशी खेळाडू आहेत.

त्यामुळे चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीनच परदेशी खेळाडू असल्याने ते इम्पॅक्ट प्लेअर म्हणून भारतीय किंवा परदेशी खेळाडूला खेळवू शकतात.पण गुजरातच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार परदेशी खेळाडू असल्याने ते इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ भारतीय खेळाडूला खेळवू शकतात.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसीठी चेन्नईने राखीव खेळाडूंमध्ये मथिशा पाथिराना, मिचेल सँटेनर, सुभ्रांशू सेनापती, शेख राशिद आणि आकाश सिंग यांना निवडले आहे. तसेच गुजरातने विजय शंकर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, जयंत यादव आणि शिवम मावी यांना राखीव खेळाडूंमध्ये निवडले आहे.

GT vs CSK
Adidas करणार टीम इंडियाची किट स्पॉन्सर, IPL दरम्यान BCCI सचिव जय शाह यांची घोषणा

अंतिम सामन्यात जाण्याची संधी

या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ पुन्हा एकदा अंतिम सामना खेळण्यास उत्सुक असतील. जर हा सामना चेन्नईने जिंकला, तर चन्नई तब्बल 10 व्यांदा अंतिम सामन्यात खेळेल, तसेच जर गुजरातने हा सामना जिंकला, तर गुजरात सलग दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळेतील.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • चेन्नई सुपर किंग्स - ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महिश तिक्षणा

  • गुजरात टायटन्स - शुभमन गिल, वृद्धिमान साहा(यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या(कर्णधार), दसुन शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com