
Cricketer's Love Story: टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंप्रमाणेच लेगस्पिनर पियुष चावलाचे वैयक्तिक आयुष्यही खूप मनोरंजक आहे. पियुषला त्याच्या जादुई गोलंदाजीसाठी ओळखतात, पण त्याची प्रेमकहाणीही एखाद्या खेळाडूपेक्षा कमी नाही. पियुष त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडला होता, इतकेच नाही तर त्याने त्याच मुलीशी लग्नही केले. हे दोघेही आता एका मुलाचे पालक आहेत.
दरम्यान, पियुष चावला त्याच्या शेजारी राहणाऱ्या अनुभूती चौहानच्या लहानपणीच प्रेमात पडला होता. घर जवळच असल्याने तो तिच्या घरी वारंवार जात असे. इथून हळूहळू दोघांची प्रेमकहाणी फुलली. 24 डिसेंबर 1988 रोजी उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) जन्मलेल्या पीयूष चावलाने 29 नोव्हेंबर 2013 रोजी अनुभूती चौहानसोबत लग्न केले. पियुष आणि अनुभूती मुरादाबादमध्ये शेजारी-शेजारी राहत होते.
तसेच, अनुभूती चौहान ही एमबीए पदवीधर असून लग्नाच्या वेळी कंपनीत एचआर म्हणून काम करत होती. पीयूष आणि अनुभूती एकमेकांना 2 वर्षे डेट करत होते. अनुभूतीला दोन वर्षे डेट केल्यानंतर पीयूषने जुलै 2013 मध्ये तिच्याबरोबर लग्न केले. लग्नानंतर तब्बल चार वर्षांनी 25 मार्च 2017 रोजी पियुष आणि अनुभूतीला मुलगा झाला, ज्याचे नाव अद्विक ठेवण्यात आले. पियुष अनेकदा स्वतःचे आणि अद्विकचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत असतो.
शिवाय, पियुष चावलाने इंग्लंडविरुद्ध (England) मोहाली कसोटीत भारताकडून (India) पदार्पण केले. त्याने 3 कसोटीत 7, 25 एकदिवसीय सामन्यात 32 आणि 7 टी-20 सामन्यात 4 बळी घेतले आहेत. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना 2012 मध्ये मुंबईत इंग्लंडविरुद्ध खेळला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.