Under-19 Men's Asia Cup मध्ये भारताची विजयी सुरुवात; अर्शिन कुलकर्णीची अष्टपैलू कामगिरी

Team India: भारताने अफगाणिस्तानवर सात गडी राखून विजय मिळवला, तर पाकिस्तानने नेपाळचा सात गडी राखून पराभव केला.
Arshin Kulkarni
Arshin Kulkarni Dainik Gomantak

Under-19 Men's Asia Cup Tournament: अंडर-19 मेन्स एशिया कप 2023 सुरु झाला आहे. पहिल्या दिवशी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी विजयी सुरुवात केली आहे. भारताने अफगाणिस्तानवर सात गडी राखून विजय मिळवला, तर पाकिस्तानने नेपाळचा सात गडी राखून पराभव केला. भारताकडून अर्शिन कुलकर्णीने आपल्या अष्टपैलू खेळीने सर्वांची मने जिंकली. प्रथम गोलंदाजी करताना अर्शिनने आठ षटकांत केवळ 29 धावा देत तीन बळी घेतले आणि त्यानंतर फलंदाजी करताना नाबाद 70 धावा केल्या. भारताने पहिल्यांदा गोलंदाजी करताना अफगाणिस्तानला 50 षटकांत 173 धावांवर रोखले होते. अफगाणिस्तानकडून जमशीद झद्रानने सर्वाधिक 43 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने अवघ्या 37.3 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले.

दरम्यान, अर्शिन 70 धावा करुन नाबाद परतला तर मुशीर खानने 48 धावा केल्या. 171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 76 धावांत तीन विकेट गमावल्या. आदर्श सिंग 17 धावा करुन बाद झाला. अर्शिनने भारताचा डाव एका बाजूकडून सावरला होता. मात्र, रुद्र पटेलच्या रुपाने भारतीय संघाला दुसरा धक्का बसला, त्यानंतर कर्णधार उदय सहारन बाद झाला.

दरम्यान, अफगाणिस्तान संघ मोठा उलटफेर करेल असे वाटत होते, परंतु अर्शिन आणि मुशीर यांनी अतिशय हुशारीने फलंदाजी केली आणि ACC मेन्स अंडर-19 एशिया कपच्या पहिल्या सामन्यात भारताला विजय मिळवून दिला. दुसरीकडे, पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास नेपाळचा संघ केवळ 152 धावांवर ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद जीशानने 9.2 षटकात केवळ 19 धावा देत सहा बळी घेतले. नेपाळकडून उत्तम मगरने 51 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात अझान अवेस 56 धावा करुन नाबाद माघारी परतला. तर कर्णधार साद बेगने 50 धावांची खेळी केली. पाकिस्तानने अवघ्या 26.2 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com