India vs Australia 2nd ODI: मोहालीतील पहिला वनडे हरल्यानंतर ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन करायचे आहे. पाहुण्यांसाठी दुसरा सामना करो या मरो असा असणार आहे.
उभय देशांमधील दुसरा सामना 24 सप्टेंबरला इंदूरमध्ये होणार आहे. कांगारु संघाने 20220-21 पासून भारतात एकही वनडे मालिका गमावलेली नाही. त्यांचा विक्रम कायम ठेवण्याचा मानस असेल.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथसाठीही हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यात तो इतिहास रचू शकतो.
भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात स्मिथच्या बॅटने कमाल केल्यास तो आपल्याच देशाच्या माजी क्रिकेटपटूने केलेल्या धावांचा विक्रम मोडू शकतो. यासाठी स्मिथला 27 धावांची गरज आहे.
भारताविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणारा स्टीव्ह स्मिथ हा सहावा फलंदाज आहे. त्याने टीम इंडियाविरुद्ध आतापर्यंत 1186 धावा केल्या आहेत. स्मिथने 5 शतके आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत.
स्मिथ इंदूरमध्ये भारताविरुद्धच्या (India) दुसऱ्या सामन्यात खेळेल तेव्हा त्याची नजर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड बूनच्या विक्रमावर असेल. डेव्हिड बूनने भारताविरुद्धच्या 29 वनडे सामन्यांमध्ये 1212 धावा केल्या होत्या ज्यात 2 शतके आणि 7 अर्धशतकांचा समावेश होता.
बूनला मागे सोडण्यासाठी स्मिथला फक्त 27 धावा करण्याची गरज आहे. जर स्टीव्ह स्मिथने दुसऱ्या वनडे सामन्यात 27 धावा केल्या तर तो भारताविरुद्ध वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणारा कांगारु संघातील 5वा फलंदाज ठरेल.
स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) सध्या फॉर्मात नाही. यावर्षी वनडेत तो संघर्ष करत आहे. या काळात तो दुखापतीमुळेही बाहेर राहिला. 2023 मध्ये आतापर्यंत स्मिथने 4 सामन्यांच्या 3 डावात केवळ 63 धावा केल्या आहेत.
या आकडेवारीवरुन त्याची कामगिरी खूपच सुमार असल्याचे दिसून येते. स्मिथची गणना मोठ्या खेळाडूंमध्ये होत असली तरी. मात्र, अशा खेळाडूला फॉर्ममध्ये येण्यासाठी फक्त एका चांगल्या खेळीची गरज असते.
दुसरीकडे, स्टीव्ह स्मिथ जवळपास 13 वर्षांपासून वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करत आहे. या कालावधीत त्याने 143 सामन्यांच्या 127 डावांमध्ये 4980 धावा केल्या आहेत.
स्मिथच्या नावावर वनडे सामन्यांमध्ये 12 शतके आणि 29 अर्धशतके आहेत. त्याची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या 164 धावा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.