Yashasvi Jaiswal: पहिल्याच कसोटीत जयस्वालकडून विंडिज खेळाडूविरुद्ध अपशब्दांचा वापर, व्हिडिओ व्हायरल

Video: पदार्पणाच्या सामन्यात शतक केल्यानंतर जयस्वाल वेस्ट इंडिज खेळाडूविरुद्ध अपशब्दांचा वापर करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
West Indies vs India, 1st Test
West Indies vs India, 1st TestDainik Gomantak
Published on
Updated on

Yashasvi Jaiswal abusing West Indies player during 1st Test in Dominica: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिकामधील रोसौ येथील विंडसर पार्क येथे खेळला जात आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेरपर्यंत भारताने यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांच्या शतकाच्या जोरावर पकड मजबूत केली आहे. 

पण याचसामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात जयस्वाल अपशब्द वापरताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की जयस्वालने शतक केल्यानंतर तो विराट कोहलीबरोबर फलंदाजी करत आहे.

यावेळी धाव घेत असताना वेस्ट इंडिजचा गोलंदाज केमार रोच धावण्याच्या मध्ये आल्याने जयस्वालने त्याच्याविरुद्ध अपशब्दांचा वापर केला. यावेळी विराटही जयस्वालची बोलताना दिसत आहे. दरम्यान, जयस्वालचा आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाला.

West Indies vs India, 1st Test
IND vs WI, 1st Test: रोहित-जयस्वालची दमदार शतके! टीम इंडियाची मोठ्या आघाडीसह सामन्यावर भक्कम पकड

जयस्वालची शानदार खेळी

दरम्यान, या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या जयस्वालने शानदार फलंदाजी करताना शतक साजरे केले. त्याने सलामीला कर्णधार रोहित शर्माबरोबर 229 धावांची विक्रमी भागीदारीही केली. ही वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय सलामीवीरांनी केलेली सर्वात मोठी भागीदारी ठरली.

दरम्यान, रोहित 103 धावांवर आणि त्यानंतर शुभमन गिल 6 धावांवर बाद झाल्यानंतरही जयस्वालने त्याची लय बिघडू दिली नाही. त्याने विराटला साथीला घेत भारताचा डाव पुढे नेला. दुसऱ्या दिवसाखेर जयस्वाल आणि विराट यांच्यातही 72 धावांची नाबाद भागीदारी झाली आहे.

West Indies vs India, 1st Test
Yashasvi Jaiswal: 'माझ्या आई-वडिलांसाठी...', पहिल्या कसोटी शतकानंतर जयस्वाल इमोशनल, पाहा व्हिडिओ

दुसऱ्या दिवसाखेर जयस्वाल 350 चेंडूत 143 धावांवर नाबाद आहे. तसेच विराट 96 चेंडूत 36 धावांवर नाबाद आहे. त्यामुळे भारताने दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात 113 षटकात 2 बाद 312 धावा केल्या असून भारतीय संघ 162 धावांनी आघाडीवर आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 64.3 षटकात 150 धावांवर संपुष्टात आला होता.

जयस्वालला मोठ्या विक्रमाची संधी

जयस्वल 143 धावांवर नाबाद असल्याने त्याला आता एका मोठ्या विक्रमाची संधी आहे. हा त्याचा पहिलाचा कसोटी सामना आहे. त्यामुळे जर त्याने या सामन्यात द्विशतकाला गवसणी घातली, तर तो असा पहिलाच भारतीय खेळाडू ठरेल, जो पदार्पणाच्या कसोटीत द्विशतक करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com