IND vs SA: सिराजच्या पुनरागमनामुळे या खेळाडूचे वाढले टेन्शन

Mohammad Siraj: उभय संघांमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराजला संधी देण्यासाठी एका खेळाडूला बाहेर बसवले जाऊ शकते.
Mohammad Siraj
Mohammad SirajDainik Gomantak
Published on
Updated on

India vs South Africa 2nd T20: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेदरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला या मालिकेत संधी देण्यात आली आहे. उभय संघांमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराजला संधी देण्यासाठी एका खेळाडूला बाहेर बसवले जाऊ शकते.

संघातील या खेळाडूचे वाढले टेन्शन

टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची (Team India) ही शेवटची टी-20 मालिका आहे, टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने टीम बेस्ट कॉम्बिनेशनचा विचार करत आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजही टी-20 विश्वचषकासाठी खेळू शकतो. अशा स्थितीत मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमध्ये तो कर्णधार रोहित शर्माची पहिली पसंती असणार आहे. मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) संघात संधी मिळाली तर, हर्षल पटेलला प्लेइंग 11 मधून बाहेर बसावे लागू शकते.

Mohammad Siraj
IND vs SA: दुखापतीमुळे टी-20 मालिकेतून बुमराह आऊट, या खेळाडूला संघात मिळाली संधी

गेल्या काही वर्षांत वारंवार फ्लॉप

हर्षल पटेल नुकताच दुखापतीतून बरा झाला आहे. दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) खेळल्या गेलेल्या T20 मालिकेतून तो टीम इंडियामध्ये परतला. मात्र या मालिकेत हर्षल पटेल पूर्णपणे फ्लॉप ठरला. यातच आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) पहिल्या टी-20 मध्ये त्याने शानदार कामगिरी केली. टीम इंडियाच्या T20 विश्वचषक संघात हर्षल पटेलचाही समावेश आहे, मात्र पुनरागमनानंतर तो आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे.

टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी

मोहम्मद सिराज हा टीम इंडियाच्या कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग आहे, मात्र त्याला एकदिवसीय आणि टी-20 मध्ये सलग संधी मिळालेल्या नाहीत. मोहम्मद सिराज टीम इंडियाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्याने भारतासाठी 13 कसोटी सामन्यात 40 बळी, 10 एकदिवसीय सामन्यात 10 बळी आणि 5 टी-20 सामन्यात 5 बळी घेतले आहेत.

Mohammad Siraj
IND vs SA: Rohit Sharma ने तोडला MS Dhoni चा 'हा' रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, दीपक चहर, उमेश यादव, श्रेयस अय्यर , शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com