Goa Womens Team
Goa Womens Team Dainik Gomantak

34th National Senior Tennis Ball Cricket Tournament: गोव्याच्या महिलांना 'अजिंक्यपद'; छत्तीसगडचा 41 धावांनी पराभव

Goa Womens Team: अंतिम लढतीत त्यांनी छत्तीसगडला 41 धावांनी पराभूत केले. ही स्पर्धा तमिळनाडूतील रामथानपुरम येथे झाली.
Published on

34th National Senior Tennis Ball Cricket Tournament: गोव्याच्या महिलांनी 34व्या राष्ट्रीय सीनियर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत विजयी घोडदौड राखताना अजिंक्यपदाला गवसणी घातली. अंतिम लढतीत त्यांनी छत्तीसगडला 41 धावांनी पराभूत केले. ही स्पर्धा तमिळनाडूतील रामथानपुरम येथे झाली.

दरम्यान, अंतिम लढतीत गोव्याने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 8 षटकांत 71 धावा केल्या. संघाची कर्णधार दिशा कांबळी हिने सर्वाधिक नाबाद 41 धावांची शानदार खेळी खेळली. अमिशा शेटगावकर हिने नाबाद 26 धावा केल्या. दरम्यान, प्रत्युत्तरादाखल छत्तीसगडला 8 षटकांत 5 बाद 30 धावाच करता आल्या. सिद्धी च्यारी (2-11), संतोषी तुयेकर (1-14), दिशा कांबळी (1-7) यांनी छत्तीसगडला रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Goa Womens Team
Goa U23 Women's Team: 23 वर्षांखालील महिला टी20 स्पर्धेसाठी गोवा संघाची घोषणा; पूर्वजाकडे नेतृत्व

तत्पूर्वी, दिशा कांबळी हिच्या नाबाद 31 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर गोव्याने उपांत्य लढतीत उत्तर प्रदेशला 8 विकेट राखून हरवले होते. दिशा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली. राष्ट्रीय विजेत्या गोव्याच्या महिला संघाला मुख्य प्रशिक्षक नीलेश नाईक, प्रशिक्षक हरेश पार्सेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com