Indian Super League: एफसी गोवाची तिसऱ्या स्थानी मुसंडी

Indian Super League: इंडियन सुपर लीग स्पर्धेत एफसी गोवा विरुध्द ईस्ट बंगाल यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळाला.
FC Goa
FC GoaDainik Gomantak

पणजी: इंडियन सुपर लीग स्पर्धेत एफसी गोवा विरुध्द ईस्ट बंगाल यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळाला. सामन्याच्या पूर्वार्धातील 23 मिनिटांच्या खेळात स्पॅनिश खेळाडू इकेर ग्वोर्रोचेना याने शानदार हॅटट्रिक साधली. त्या बळावर एफसी गोवाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत ईस्ट बंगालवर 4-2 फरकाने आकर्षक विजय मिळविला आणि गुणतक्त्यात तिसऱ्या क्रमांकापर्यंत मुसंडी मारली.

दरम्यान, सामना गुरुवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. या विजयासह एफसी गोवाच्या (FC Goa) स्पर्धेची प्ले-ऑफ फेरी गाठण्याच्या आशाही प्रबळ झाल्या. स्पर्धेतील आठव्या विजयामुळे १६ सामन्यानंतर त्यांचे २६ गुण झाले आहेत.

तिसरा क्रमांक मिळताना कार्लोस पेनया यांच्या मार्गदर्शनाखाली केरळा ब्लास्टर्सवर एका गुणाची आघाडी मिळविली. मुंबई सिटी (३९ गुण) व गतविजेता हैदराबाद एफसी (३५ गुण) हे संघ यापूर्वीच प्ले-ऑफ फेरीसाठी पात्र ठरले असून अन्य चार जागांसाठी चुरस आहे. ईस्ट बंगालचा हा स्पर्धेतील अकरावा पराभव ठरला, त्यामुळे १५ लढतीनंतर त्यांचे १२ गुण व नववा क्रमांक कायम राहिला. ते प्ले-ऑफ फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले.

FC Goa
Indian Super league: एफसी गोवासमोर ओडिशाचे तगडे आव्हान; उद्या महत्वाची लढत

एफसी गोवाचे सामन्यावर वर्चस्व

इकेर ग्वोर्रोचेना याने अनुक्रमे ११, २१ व २३व्या मिनिटास गोल करून एफसी गोवातर्फे स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक नोंदविली. येथेच सामन्याचा निकाल स्पष्ट झाला. स्पॅनिश मध्यरक्षकाने पहिले दोन्ही गोल नोआ सदावी याच्या असिस्टवर केले. एफसी गोवासाठी चौथा गोल ब्रँडन फर्नांडिसने ५३व्या मिनिटास प्रेक्षणीय फ्रीकिक फटक्यावर केला.

सामन्याच्या पूर्वार्धात एफसी गोवाने पूर्ण वर्चस्व राखले. ईस्ट बंगालने उत्तरार्धात कडवा प्रतिकार केला. त्यांनी सात मिनिटांत दोन गोल करून पिछाडी कमी केली, पण एफसी गोवाची आघाडी ते भेदू शकले नाहीत. कोलका्त्यातील संघाला व्ही. सुहेर याने ५९व्या मिनिटास, तर बदली खेळाडू सार्थक गोलुई याने ६६व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल नोंदविला.

दृष्टिक्षेपात...

- एफसी गोवाचे ईस्ट बंगालवर सलग २ विजय

- पहिल्या टप्प्यात कोलकाता (Kolkata) येथे एफसी गोवा २-१ फरकाने विजयी

- ३० वर्षीय इकेर ग्वोर्रोचेन याचे आता १६ सामन्यांत १० गोल, स्पर्धेत सर्वाधिक

- २८ वर्षीय ब्रँडन फर्नांडिसचे यंदा १६ सामन्यांत २ गोल, एकंदरीत ८७ आयएसएल सामन्यांत ७ गोल

FC Goa
Indian Super League : ओडिशाचा केरळा ब्लास्टर्सवर पिछाडीवरून झुंजार विजय

नोआ सदावी याचे स्पर्धेतील १६ सामन्यांत ७ असिस्ट, शिवाय ६ गोलही

- एफसी गोवाचे स्पर्धेत ३० गोल, दुसऱ्या क्रमांकावरील हैदराबादला गाठले, मुंबई सिटीचे सर्वाधिक ४५ गोल

- ईस्ट बंगाल संघावर प्रतिस्पर्ध्यांचे एकूण ३१ गोल, गोल स्वीकारण्यात र्नॉर्थईस्ट युनायटेडनंतर (४१) दुसरा संघ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com