GCA Election : जीसीए निवडणुकीत संजय काणेकर यांना नियमाचा दणका

छाननीत अर्ज फेटाळला, सहा जागांसाठी 30 उमेदवार
Goa Cricket Association Election
Goa Cricket Association ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

GCA Election : गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) निवडणुकीत पदाधिकारी कालावधी नियमाचा दणका संजय काणेकर यांना बसला. नियमभंग केल्याच्या कारणास्तव निवडणूक अधिकारी एम. मोदास्सीर यांनी त्यांचा अर्ज छाननीनंतर फेटाळण्यात आल्याचे जाहीर केले. जीसीएच्या सहा जागांसाठी आता 30 उमेदवार रिंगणात आहेत.

यामध्ये अध्यक्षपदासाठी चार, उपाध्यक्षपदासाठी चार, सचिवपदासाठी सहा, संयुक्त सचिवपदासाठी चार, खजिनदारपदासाठी सहा, तर सदस्यपदासाठी सहा उमेदवारांचे अर्ज छाननी ग्राह्य ठरले. गुरुवारपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुभा असेल, 27 ऑगस्ट रोजी जीसीए व्यवस्थापकीय समितीची निवडणूक नियोजित आहे.

जीसीए निवडणुकीसाठी एकूण 32 अर्ज दाखल झाले होते. सचिवपदासाठी दया पागी यांचे दोन अर्ज होते, त्यापैकी त्यांचा एक अर्ज बाद ठरला, तर नियमभंगामुळे काणेकर यांचा उपाध्यक्षपदाचा अर्ज नाकारण्यात आला.

Goa Cricket Association Election
Income Tax Raid in Goa : मडगावात दोन बिल्डरांच्या घरावर आयकरची धाड

पदाधिकारी नियमाचा भंग

काणेकर यांच्या अर्जाच्या छाननीविषयी निवडणूक अधिकाऱ्याने आदेश जारी करून साऱ्या बाबी स्पष्ट केल्या. त्यानुसार, काणेकर यांनी आपल्या जाहीरनाम्यात आपण 2006-2009 आणि 2009-2012 या कालावधीसाठी जीसीए सदस्य राहिल्याचे नमूद केले. मात्र प्राप्त नोंदींनुसार, काणेकर 2000-2003, 2003-2006, 2006-2009, 2009-2012 आणि 2012-2015 या कालावधीत जीसीएचे पदाधिकारी होते. नोंदीनुसार ते 2000-2003 व 2009-2012 या कालावधीसाठी सदस्य, 2003-2006 व 2006-2009 कालावधीसाठी संयुक्त सचिव, तर 2012-2015 या कालावधीसाठी तृतीय उपाध्यक्ष होते. 6(सी)(5)(एफ) या नियमाच्या तरतुदींनुसार, एखादा इसम संघटनेच्या पदाधिकारीपदी एकूण 9 वर्षांच्या कालावधीसाठी असेल, तर अपात्र ठरतो. या कारणास्तव संजय काणेकर यांची उमेदवारी अपात्र ठरते आणि अर्ज फेटाळण्यात आला, असे निवडणूक अधिकाऱ्याने आदेशात म्हटले आहे.

छाननीनंतर पात्र उमेदवार

अध्यक्ष (4) : महेश देसाई, शंभा देसाई, तुळशीदास शेट्ये, विपुल फडके

उपाध्यक्ष (4) : शंभा देसाई, समीर देसाई, अनंत नाईक, सुशांत नाईक

सचिव (6) : हेमंत पै आंगले, शंभा देसाई, दया पागी, सय्यद अब्दुल माजिद, रोहन गावस देसाई, अनंत नाईक

संयुक्त सचिव (4) : पराग देऊळकर, रुपेश नाईक, सय्यद अब्दुल माजिद, जमीर करोल

खजिनदार (6) : सय्यद अब्दुल माजिद, दया पागी, परेश फडते, अब्दुल खान, सुभाष फडते, सैबर मुल्ला

सदस्य (6) : गोविंद गावकर, रुपेश नाईक, उमेश गावस, आदित्य चोडणकर, राजेश पाटणेकर, पंढरी गावस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com