Prabir Majumdar Died: भारतीय फुटबॉल विश्वात शोककळा! दिग्गज डिफेंडर प्रबीर मुजूमदार यांचे निधन

Prabir Majumdar Died: भारताचे माजी डिफेंडर प्रबीर मुजूमदार यांचे निधन झाले आहे.
Prabir Majumdar
Prabir MajumdarX/IndianFootball

Former India Footballer Prabir Majumdar passes away:

भारताचे माजी फुटबॉलपटू प्रबीर मुजूमदार यांचे गुरुवारी (28 डिसेंबर) दीर्घकालिन आजारामुळे निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि मुलगा आहे.

प्रबीर मुजूमदार हे भारतातील फुटबॉलमधील 1960 आणि 1970 च्या दशकातील स्टायलिश डिफेंडर होते. ते 1974 साली तेहरानला झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचा भागही होते.

Prabir Majumdar
Football referee punched: धक्कादायक! तुर्की फुटबॉल क्लबच्या अध्यक्षांकडून रेफ्रीला लाईव्ह सामन्यात मारहाण, तिघांना अटक

देशांतर्गत फुटबॉलमध्ये त्यांनी त्यांच्या खेळाने आपली मोठी छाप पाडली होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ईस्ट बंगाल आणि ईस्टर्न रेल्वे संघाचे प्रतिनिधित्वही केले. त्याचबरोबर संतोष ट्रॉफी स्पर्धेत त्यांनी बंगालचेही प्रतिनिधित्व केले. 1970च्या दशकात ईस्ट बंगालने केलेल्या शानदार कामगिरीत त्यांचेही मोठे योगदान राहिले.

त्यांच्या निधनाबद्दल अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने शोक व्यक्त केला आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे की 'प्रबीर-दा त्यांच्या काळातील सर्वात विसंबण्याजोगे आणि आदरणीय डिफेंडर होते आणि अनेक स्टार खेळाडूंमध्ये त्यांनी त्यांची वेगळी ओळख मिळवली होती.मी त्यांच्या कुटुंबियांकडे या दु:खद प्रसंगी सहानुभूती व्यक्त करतो.'

Prabir Majumdar
वालांका आलेमाव AIFF च्या कार्यकारिणीत, 85 वर्षात निवडून आलेल्या पहिल्या महिला

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सचिव एम सत्यनारायण म्हणाले, 'प्रबीर मुजूमदार त्यांच्या काळातील अव्वल फुटबॉलपटूंपैकी एक होते. त्यांनी नंतरच्या पिढीतील फुटबॉलपटूंना प्रेरणाही दिली. त्यांच्या निधनाने भारतीय फुटबॉलमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.'

प्रबीर मुजूमदार यांनी त्यांच्या कारकिर्दीतीत ईस्ट बंगालकडून अनेक स्पर्धाही जिंकल्या. ज्यात कलकत्ता फुटबॉल लीग, आयएफए शिल्ड, दुरंड कप, रोव्हर्स कप, डीसीएम ट्रॉफी, बोर्डोलोई ट्रॉफी अशा स्पर्धांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com