पणजी: कुजिरा येथील व्ही. धेंपो उच्च माध्यमिक विद्यालय संघ दिल्लीत होणाऱ्या 17 वर्षांखालील सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धेच्या राष्ट्रीय फेरीत गोव्याचे प्रतिनिधित्व करेल. राज्यस्तरीय अंतिम लढतीत त्यांनी सोमवारी नावेलीच्या रोझरी उच्च माध्यमिक विद्यालयावर एका गोलच्या पिछाडीवरून 3-2 फरकाने मात केली.
('Subroto Cup Football': Dhempo will play in High School Delhi)
क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेतील अंतिम सामना पेडे-म्हापसा क्रीडा संकुल मैदानावर झाला. स्पर्धेची राष्ट्रीय फेरी ऑक्टोबरमध्ये खेळली जाईल. विजयी संघाला शारीरिक शिक्षण शिक्षक चेतन कवळेकर व विशाल भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले.
विश्रांतीला गोलबरोबरी
साल्वादोर गामा याच्या गोलमुळे रोझरी संघाने सामन्याच्या सुरवातीस आघाडी घेतली, मात्र नंतर पेनल्टी फटक्यावर तपन मिन्ज याने धेंपो उच्च माध्यमिकला बरोबरी साधून दिली. दोन्ही संघ विश्रांतीला 1-1 असे गोलबरोबरीत होते.
उत्तरार्धात चुरस
उत्तरार्धातील खेळ सुरू झाल्यानंतर स्विव्हेल फुर्तादोच्या शानदार क्रॉस पासवर रौनक वळवईकर याने धेंपो उच्च माध्यमिकला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र तासाभराच्या खेळात रोझरी उच्च माध्यमिकने 2-2 अशी गोलबरोबरी साधली. अशेर फर्नांडिसने हा गोल केला. मात्र ६3व्या मिनिटास मर्फी फर्नांडिस याच्या गोलमुळे धेंपो उच्च माध्यमिकला पुन्हा आघाडी मिळाली व त्यांनी ती शेवटपर्यंत टिकवून दिल्लीचे तिकीट निश्चित केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.