गोव्याची धीरज-चंद्रकांत जोडी अजिंक्य

अखिल भारतीय व्हेटरन्स डबल विकेट क्रिकेट स्पर्धेत यशस्वी कामगिरी
Winners Dheeraj Narvekar and Chandrakant Ghadi
Winners Dheeraj Narvekar and Chandrakant GhadiDainik Gomantak

भारतीय व्हेटरन्स क्रिकेट मंडळातर्फे (बीव्हीसीआय) घेण्यात आलेल्या अखिल भारतीय पातळीवरील व्हेटरन्स डबल विकेट क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या धीरज नार्वेकर व चंद्रकांत (अमीर) घाडी जोडीने विजेतेपद मिळविले.

स्पर्धा उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे झाली. स्पर्धेत देशभरातील 192 व्हेटरन क्रिकेटपटू सहभागी झाले होते, त्यात 14 खेळाडू गोव्यातील होते. अंतिम लढतीत धीरज-चंद्रकांत जोडीने चंडीगडच्या जोडीवर मात करून विजेतेपद प्राप्त केले.

साखळी फेरी लढतीत त्यांनी गुजरात, महाराष्ट्र, विदर्भ संघातील जोडीला हरविले होते. बाद फेरीत त्यांनी अनुक्रमे उत्तर प्रदेश, राजस्थान, चंडीगडच्या जोडीला नमविले.

Winners Dheeraj Narvekar and Chandrakant Ghadi
ISL Football: मुंबई सिटीसमोर बंगळूरला रोखण्याचे आव्हान

व्हेटरन्स आयपीएलसाठी संधी

गोवा व्हेटरन्स क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद (बाळू) फडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी सप्टेंबरमध्ये डेहराडून येथे व्हेटरन्स क्रिकेटपटूंची आयपीएल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत माजी क्रिकेटपटूंचा सहभाग असेल.

गोव्यातील किमान सहा क्रिकेटपटूंना व्हेटरन्स आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळेल. आतापर्यंत सहा फ्रँचाईजींनी स्पर्धेसाठी उत्सुकता प्रदर्शित केली आहे. फडके बीव्हीसीआयचे उपाध्यक्षही आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com