संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मोठी घोषणा; आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव

हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपला जलवा दाखवून दिला.
Rajnath Singh
Rajnath SinghDainik Gomantak
Published on
Updated on

Asian Games 2023: हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपला जलवा दाखवून दिला. यातच आता, पदक विजेत्यांसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठी घोषणा केली आहे.

मंगळवारी (17 ऑक्टोबर) भारताच्या सशस्त्र दलातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांशी संवाद साधताना सन्माननीय संरक्षणमंत्र्यांनी ही घोषणा केली.

घोषणेनुसार, संरक्षण मंत्रालय सुवर्ण पदक विजेत्यांना INR 25 लाख, रौप्य पदक विजेत्यांना INR 15 लाख आणि कांस्यपदक जिंकणार्‍या खेळाडूंना INR 10 लाखांच्या बक्षीस रकमेसह सन्मानित करेल.

दरम्यान, या वर्षीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आम्ही एकूण 107 पदके जिंकली आहेत. गेल्यावेळी, 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आपण 70 पदके जिंकली होती. 70 पदकांवरुन 107 पदकांपर्यंतचा हा प्रवास पाहिला, तर यामध्ये सुमारे 50 टक्यांची वाढ झाली आहे.

दुसरीकडे, भारत (India) चंद्रावरही पोहोचला आहे. जगातील सर्वात मोठ्या संस्था भारताच्या विकासाचा स्वीकार करत आहेत. जागतिक बँक असो किंवा IMF, भारताच्या विकासाच्या प्रवासाची सर्वत्र चर्चा होत आहे," असे सिंह यावेळी म्हणाले.

Rajnath Singh
World Cup 2023: गणपती बाप्पा मोरया... ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल!

"यावेळी, आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वीही, पदकांबाबत आमची घोषणा होती, 'यावेळी, 100 पार'. आणि निश्चितच, तुम्ही 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण केल्या. भारतीय खेळाडूंनी आशियाई क्रिडा स्पर्धेत भारताचे नाव उंचावले. यंदाच्या आशियाई स्पर्धेत भारताने 107 पदके मिळवली,” असेही ते पुढे म्हणाले.

Rajnath Singh
World Cup मध्ये धर्माची एन्ट्री, मोहम्मद रिझवानविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल!

दुसरीकडे, 2022 च्या आशियाई स्पर्धेत क्रिकेट (पुरुष आणि महिला) आणि कबड्डी (पुरुष आणि महिला) यासह विविध गेममध्ये भारताचे वर्चस्व दिसून आले. महिला क्रिकेट संघाने फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करुन सुवर्णपदक जिंकले.

तर दुसरीकडे, भारतीय पुरुष क्रिकेट संघानेही शानदार कामगिरी करत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली होती. कबड्डीमध्ये, भारतीय महिला संघाने चायनीज तैपेईला पराभूत करुन सुवर्णपदक जिंकले तर पुरुष संघाने इराणला (Iran) पराभूत करत सुवर्णपदक जिंकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com