Cristiano Ronaldo: रोनाल्डो प्रथमच आशियातील 'या' क्लबकडून खेळणार; 2 वर्षासाठी मिळणार सुमारे 1700 कोटी रूपये

2025 सालापर्यंत करार; नव्या संघाच्या जर्सीचा फोटो केला शेअर
Cristiano Ronaldo
Cristiano RonaldoDainik Gomantak
Published on
Updated on

Cristiano Ronaldo: ख्रिस्तियानो रोनाल्डो आता इंग्लंडच्या फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड ऐवजी सौदी अरेबियाच्या क्लब अल नासेरकडून खेळताना दिसणार आहे. त्याने अल नासेरसोबत 200 मिलियन युरो (सुमारे 1775 कोटी रुपये) चा करार केला आहे. 37 वर्षीय रोनाल्डोचा क्लबसोबत 2025 पर्यंत करार आहे. म्हणजेच दोन वर्षांसाठी रोनाल्डो या क्लबकडून खेळताना दिसेल.

Cristiano Ronaldo
Team India: ऋषभ पंत अन् जस्सीचा कसोटी क्रिकेटमध्ये जलवा, BCCI ने केली मोठी घोषणा!

रोनाल्डोने सोशल मीडियावर अल नासेरची जर्सी असलेला एक फोटो शेअर केला आहे. त्यावर त्याचा आवडता क्रमांक 7 छापलेला आहे. रोनाल्डो म्हणाला की, तो अल नासरमधून खेळण्यास उत्सुक आहे. युरोपियन फुटबॉलमध्ये मी जे काही करायचे ठरवले होते ते सर्व साध्य केले आहे त्यामुळे मी भाग्यवान आहे. आता आशियात माझा अनुभव पणाला लावण्याची हीच योग्य वेळ आहे.

दरम्यान, अल नासरने सौदी अरेबिया प्रो लीगचे विजेतेपद 9 वेळा जिंकले आहे. क्लबने शेवटचे हे विजेतेपद 2019 मध्ये जिंकले होते.

Cristiano Ronaldo
T20 League: T20 सामन्यात 'या' क्रिकेटपटूचा धमाका, 12 चेंडूत ठोकल्या 60 धावा; सीता मातेच्या...

रोनाल्डोचा मँचेस्टर युनायटेडसोबतचा कार्यकाळ जून 2023 मध्ये पूर्ण होत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रोनाल्डोचे क्लबसोबतचे नाते संपुष्टात आले आहे. युनायटेडवरही त्याने टीका केली. येथे त्याला दर आठवड्याला सुमारे 5 कोटी रुपये पगार मिळत होता. रोनाल्डोने युनायटेडकडून 346 सामन्यांत 145 गोल केले आहेत. रोनाल्डो युव्हेंटस क्लबकडूनही खेळला आहे.

रोनाल्डोने पाच चॅम्पियन्स लीग विजेतेपदे जिंकली आहेत (2008, 2014, 2016, 2017, 2018). तर इटलीमधील लीगमध्ये जुव्हेंटससाठी दोन विजेतेपदे (2019, 2020) जिंकली आहेत. स्पेनमध्ये असताना (2012, 2017) रिअल माद्रिदसह आणि इंग्लंडमध्ये मँचेस्टर युनायटेडसह तीन विजेतेपदे (2007, 2008, 2009) जिंकली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com