Asian Athletics Championships : ज्योतीचे हर्डल्स शर्यतीत पहिलेच सुवर्ण ; दुसऱ्या दिवशी भारताला पाच पदके

आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा : अजय पंधराशे मीटरमध्ये विजेता
Jyoti Yarraji
Jyoti YarrajiDainik Gomantak

Asian Athletics Championships : आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेच्या पहिल्या दिवशी केवळ एक ब्राँझपदक जिंकणाऱ्या भारताने दुसऱ्या दिवशी तीन सुवर्णपदकांसह पाच पदके जिंकून भरपार्ई केली. त्यातही ज्योती यराजीचे सुवर्णपदक खास ठरले.

कारण महिलांच्या १०० मीटर हर्डल्स शर्यतीत भारताचे हे पहिलेच सुवर्ण होय. अजयकुमार सरोजने पंधराशे मीटर शर्यतीत पुन्हा एकदा सुवर्णपदकाला गवसणी घातली. महाराष्ट्राच्या ऐश्वर्या मिश्राने ब्राँझपदक जिंकले.

मात्र, अनेक आंतरराष्ट्रीय पदके जिंकणाऱ्या संजीवनी जाधवला दहा हजार मीटर शर्यतीत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. गेल्या दोन वर्षांत सतत आपल्या कामगिरीत सुधारणा करणाऱ्या २३ वर्षीय ज्योतीने १३.०९ सेकंदांत सुवर्णपदक जिंकून आशियाई पातळीवरील आपले दुसरे पदक जिंकले.

मूळ आंध्र प्रदेशातील असलेली व भुवनेश्वर येथे रिलायन्स हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये सराव करणाऱ्या ज्योतीने यंदा आशियाई इनडोअर स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. सध्या १२.८२ सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम तिच्या नावावर आहे. या शर्यतीत चीनच्या वु यांनी हिचा फाऊल झाल्याने तिला बाहेर काढण्यात आले.

Jyoti Yarraji
ICC ची मोठी घोषणा, महिला आणि पुरुष संघांना मिळणार समान बक्षीस रक्कम!

मात्र, बाहेर जाण्यापूर्वी अधिकाऱ्यांशी बराच वाद घातला. त्यातच जोरदार पाऊस झाल्याने त्याचा परिणाम ज्योतीसह इतर स्पर्धकांच्या कामगिरीवर झाला. यात भारताच्या नित्या रामराजला चौथे स्थान मिळाले. भारताला दुसरे सुवर्णपदक उत्तर प्रदेशच्या अजयकुमार सरोजने मिळवून दिले. त्याने पंधराशे मीटर शर्यतीत ३ मिनिटे ४१.५१ सेकंदांत शर्यत पूर्ण केली.

आशियाई ॲथलेटिक्समध्ये त्याने २०१७ मध्ये भुवनेश्वर येथील स्पर्धेत सुवर्ण, २०१९ मधील दोहा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. या शर्यतीत एकूण तीन पदके जिंकणारा तो भारताचा पहिलाच धावपटू ठरला.

प्रवीण चित्रावेलच्या माघारीमुळे तिहेरी उडीत अब्दुल्ला अबुबकरवर भारताची भिस्त होती. त्यानेही सुवर्ण जिंकून निराश केले नाही. त्याने १६.९२ मीटर ही यंदाच्या मोसमातील त्याची सर्वोत्तम कामगिरी केली. डेकॅथलॉनमध्ये तेजस्विन शंकरला अखेर ७५२७ गुणांसह ब्राँझपदक मिळाले.

Jyoti Yarraji
राज्याला बुद्धिबळात नाव कमवायचे असेल तर 'या' गोष्टीची आहे गरज, संघटनेने केलीय क्रीडामंत्र्यांकडे 'ही' मागणी

ऐश्वर्यामुळे दुसरे पदक

महिलांच्या चारशे मीटर शर्यतीत भारतीय धावपटूंनी नेहमीच वर्चस्व गाजविले आहे. आजही ८० मीटर अंतर शिल्लक असेपर्यंत मुंबईकर २६ वर्षीय ऐश्वर्या मिश्रा आघाडीवर होती. त्यानंतर श्रीलंकेच्या नदीशा रामानायके व रौप्यपदक विजेत्या उझबेकिस्तानच्या फरिदा सोलीवाने आघाडी घेतली.

अखेर ऐश्वर्याला ब्राँझपदकावर (५३.०७ सेकंद) समाधान मानावे लागले. त्यामुळे आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत चारशे मीटर शर्यतीत पदक जिंकणारी ती महाराष्ट्राची दुसरी धावपटू ठरली. यापूर्वी सोलापूरच्या वंदना शानबाग हिने १९८७ च्या सिंगापूर स्पर्धेत पी. टी. उषापाठोपाठ रौप्यपदक जिंकले होते. पुरुषांच्या चारशे मीटर शर्यतीत महम्मद अजमल चौथा व राजेश रमेशला सहावे स्थान मिळाले.

Jyoti Yarraji
IND vs WI: रोहित-जयस्वालची ऐतिहासिक भागीदारी! नव्वद वर्षांच्या इतिहासात पहिल्यांच झाला 'हा' पराक्रम

ज्योती यराजी

महिलांच्या १०० मीटर हर्डल्स शर्यतीचा १९७३ च्या पहिल्या स्पर्धेपासून समावेश असून यात पहिले पदक जिंकण्यासाठी भारताला जकार्ता येथे २००० मध्ये झालेल्या स्पर्धेपर्यंत वाट पाहावी लागली. यात अनुराधा बिस्वालने ब्राँझपदक जिंकून हा दुष्काळ संपविला होता.

त्यानंतर २०१३ च्या पुणे येथील स्पर्धेत हेमाश्री जयबळने पुन्हा ब्राँझपदक जिंकून भारताला दुसरे पदक मिळवून दिले होते. ज्योती यराजीने सुवर्ण जिंकून जपान, चीन, श्रीलंका, कझाकस्तान व कोरियाच्या पंक्तीत भारताला स्थान मिळवून दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com