Arshdeep Singh: अर्शदीपसाठी 72 धावा करणाऱ्या बालबर्नीची विकेट ठरली विक्रमी; चहल, बुमराहलाही टाकलं मागे

IRE vs IND, 2nd T20I: अर्शदीप सिंगने बालबर्नीची विकेट घेत खास विक्रम केला असून चहल आणि बुमराहलाही मागे टाकले आहे.
Arshdeep Singh
Arshdeep SinghDainik Gomantak
Published on
Updated on

Ireland vs India, 2nd T20I Arshdeep Singh Record:

रविवारी भारताने आयर्लंडविरुद्ध सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 33 धावांनी विजय मिळवला. याबरोबरच मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात खेळताना वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने खास विक्रम नोंदवला.

या सामन्यात अर्शदीपने भारतासाठी महत्त्वाची विकेट घेतली. त्याने आयर्लंडकडून दमदार खेळ करणाऱ्या अँड्र्यु बालबर्नीला 16 व्या षटकात 72 धावांवर बाद केले. त्यामुळे भारतासाठी विजयाचा मार्ग सुकर झाला होता. ही विकेट अर्शदीपसाठी विक्रमी ठरली.

Arshdeep Singh
Arshdeep Singh Video: अर्शदीपच्या बॉलिंगचा इंग्लंडमध्ये कहर! शतकवीर स्मिथचा वेगवान चेंडूने उडवला स्टंप

अर्शदीपचा विक्रम

बालबर्नीची विकेट घेत अर्शदीपने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 50 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. दरम्यान, अर्शदीपने 33 व्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात खेळताना हा टप्पा गाठला.

त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद 50 विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. त्याने युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराहला मागे टाकले आहे.

युझवेंद्र चहलने 34 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 50 विकेट्सचा टप्पा पार केला होता. तसेच जसप्रीत बुमराहने 41 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 50 विकेट्स पूर्ण केल्या होत्या.

या यादीत अव्वल क्रमांकावर कुलदीप यादव असून त्याने 30 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 50 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.

Arshdeep Singh
Jasprit Bumrah Record: कॅप्टन बुमराहचा कमबॅकमध्येच जलवा! आजपर्यंत कोणालाच न जमलेला विक्रम केला नावावर

भारताचा विजय

दरम्यान सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास दुसऱ्या टी20 सामन्यामध्ये भारताने दिलेल्या 186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडकडून अँड्र्यु बालबर्नीने 72 धावा करत एकाकी झुंज दिली होती. तसेच मार्क एडेयरने 23 धावा केल्या.

या दोघांव्यतिरिक्त आयर्लंडकडून कोणालाही 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्यामुळे आयर्लंडला 20 षटकात 8 बाद 152 धावाच करता आल्या.

भारताकडून प्रसिद्ध कृष्णा, रवी बिश्नोई आणि कर्णधार जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच अर्शदीप सिंगने 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 185 धावा केल्या होत्या. भारताकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 58 धावांची खेळी केली. तसेच संजू सॅमसनने 40 धावा केल्या. तर अखेरीस फटकेबाजी करताना रिंकू सिंगने 38 धावांची आणि शिवम दुबेने नाबाद 22 धावांची खेळी केली.

आयर्लंडकडून बॅरी मॅककार्थीने 2 विकेट्स घेतल्या. तसेच मार्क एडेयर, क्रेग यंग आणि बेंजामिन व्हाईट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com