AFG vs IRE: कसोटी क्रिकेटमध्ये आयर्लंडने नोंदवला पहिला विजय; अफगाणिस्तानला हरवून रचला इतिहास

Afghanistan vs Ireland Test Match: आयरिश संघाने शुक्रवार 1 मार्च रोजी इतिहास रचला. यूएई (अबू धाबी) येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात आयर्लंडने अफगाणिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला.
Ireland Team
Ireland Team@cricketireland

Afghanistan vs Ireland Test Match: आयरिश संघाने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला. या सामन्यापूर्वी 2018 ते 2024 या कालावधीत आयर्लंडने सहा कसोटी मालिका खेळल्या होत्या, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. या काळात संघाने सात सामने खेळले होते, मात्र सातही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

आता आयरिश संघाने आज (शुक्रवार, 1 मार्च रोजी) इतिहास रचला. यूएई (अबू धाबी) येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात आयर्लंडने अफगाणिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. हा सामना तिसऱ्या दिवशीच संपला. चारही डावांचा समावेश केल्यानंतरही या सामन्यात 800 धावा झाल्या नाहीत. सामन्यादरम्यान आयर्लंडच्या गोलंदाजांची शानदार कामगिरी पाहायला मिळाली.

सामन्याची स्थिती काय होती?

दरम्यान, अफगाणिस्तानने आयर्लंडला विजयासाठी 111 धावांचे लक्ष्य दिले होते. आयर्लंडची सुरुवात खराब झाली. संघाने 13 धावांवर तीन विकेट गमावल्या. त्यानंतर कर्णधार अँड्र्यू आणि टकरने डावाची धुरा सांभाळली आणि संघाला विजयापर्यंत नेले. कर्णधार अँड्र्यूने 58 धावांची नाबाद खेळी खेळली.

दुसरीकडे, या सामन्यात गोलंदाज मार्क ॲडर हा आयर्लंडच्या विजयाचा नायक ठरला, त्याने दोन्ही डावात 8 बळी घेतले. याशिवाय, क्रेग यंगने दोन्ही डावात एकूण 5 विकेट्स घेतल्या. फलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, पॉल स्टर्लिंगने पहिल्या डावात शानदार अर्धशतक झळकावले. दुसऱ्या डावात कर्णधार अँड्र्यू बालबर्नीने 58 धावांची नाबाद खेळी खेळली.

Ireland Team
ZIM vs IRE: T20 मालिकेत आयर्लंडचा झिम्बाब्वेला 'दे धक्का'; तिसऱ्या T20 मध्ये टेक्टर-डॉकरेलची कमाल

तसेच, आयर्लंडने पहिल्या डावात 83.4 षटकात 263 धावा केल्या होत्या. कॅपरने 49, हॅरीने 32, स्टर्लिंगने 52, टकरने 46 आणि अँडीने 38 धावांचे योगदान दिले होते. अफगाणिस्तानकडून रहमानने 5 बळी घेतले होते. अफगाणिस्तान संघाने दुसऱ्या डावात 218 धावा केल्या होत्या. कर्णधार शाहिदीने 55 आणि गुरबाजने 46 धावांचे योगदान दिले.

Ireland Team
IRE vs IND, 3rd T20I: आयर्लंडविरुद्धचा तिसरा टी-20 सामना पावसामुळे रद्द, भारताने मालिका 2-0 ने जिंकली

सर्व आयर्लंड कसोटी मालिकेचे निकाल

आयर्लंड विरुद्ध पाकिस्तान, 2018: पाकिस्तान 0-1 ने जिंकला

अफगाणिस्तान वि आयर्लंड, 2018-19: अफगाणिस्तान 1-0 विजयी

इंग्लंड विरुद्ध आयर्लंड, 2019: इंग्लंड 1-0 ने जिंकला

बांगलादेश विरुद्ध आयर्लंड, 2022-23: बांगलादेश 1-0 विजयी

श्रीलंका विरुद्ध आयर्लंड, 2023: श्रीलंका 2-0 ने जिंकली

इंग्लंड विरुद्ध आयर्लंड, 2023: इंग्लंड 1-0 ने जिंकला

अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड, 2023/24: आयर्लंड 1-0 विजयी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com