Zumba Benefits
Zumba TipsDainik Gomantak

Zumba: शरीरापासून, मनाला ताजेपणा देणारा व्यायामप्रकार 'झुंबा'

Zumba Benefits: या व्यायामासाठी (किंवा नृत्यात्मक हालचालींसाठी) झुंबा आपले स्वतंत्र संगीत पाठवते ज्याची निर्मिती स्वत: झुंबा आस्थापनाने केलेली असते. या संगीतावर झुंबाचा कॉपीराईट असतो.‌
Published on

झुंुंबा हा स्वतंत्र नृत्यप्रकार नसून वेगवेगळ्या नृत्य शैलींचे मिश्रण केला गेलेला तो एक ‘प्रोग्राम’ आहे. झुंबा हा  एक अमेरिकन ब्रँड आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी हा प्रोग्राम वापरला जातो. मेरिंगे, साल्सा, भांगडा, आफ्रिकन इत्यादी प्रकारच्या नृत्यातील घटक वापरून, शारीरिक तंदुरुस्तीचे उद्दिष्ट बाळगून त्यातील हालचालींच्या रचना केल्या गेल्या आहेत.

या व्यायामासाठी (किंवा नृत्यात्मक हालचालींसाठी) झुंबा आपले स्वतंत्र संगीत पाठवते ज्याची निर्मिती स्वत: झुंबा आस्थापनाने केलेली असते. या संगीतावर झुंबाचा कॉपीराईट असतो.‌ झुंबा प्रशिक्षकांनी हेच संगीत वापरणे अनिवार्य असते.

झुंबा व्यायामप्रकार फक्त झुंबाचे मान्यता प्राप्त प्रशिक्षक घेऊ शकतात.‌ प्रत्येक प्रशिक्षकाला 'झिन' असे संबोधले जाते. झुंबा इन्स्ट्रक्टर नेटवर्क- 'झीन'चे हे सारे भाग आहेत (अर्थात ही मान्यता न घेताही अनेक बोगस झुंबा कार्यक्रमही चालू आहेत ही बाब वेगळी) आणि हे नेटवर्क जागतिक स्तरावर लोकप्रिय आहे. जवळजवळ 193 देशांमध्ये झुंबा चालतो. 

झुंबामध्ये एरोबिक हालचालीना खूप महत्त्व आहे. या हालचाली करताना हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढल्याचे जाणवते, शरीरातून घाम ओघळतो आणि सबंध शरीर एका वेगळ्या ऊर्जेने भारून जाते.

हा व्यायाम एक तासांचा जरी असला तरी गतिमान आणि मंद हालचालीचा क्रम एका मागोमाग एक असा अनुसरल्याने प्रत्येकाला तो सुलभ आणि मजेचा होतो. हृदयाला विश्रांती घेण्यासाठी योग्य वेळ त्यात दिली जाते. त्या एका तासात शरीरातील सुमारे 600 ते 800 कॅलरी जाळल्या जातात. 

Zumba Benefits
झुंबाचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीये का? वजन कमी करण्यासाठी....

अर्थात, या व्यायामप्रकाराने आपले शरीर संतुलित बनते इतकाच त्याचा फायदा नाही तर त्यातील नृत्यात्मक हालचालींमुळे एक वेगळा आत्मविश्वासही लाभतो. आपल्या भारतीय संस्कृतीत एरवी आपण मुक्तपणे नाचत नसतो.

आपल्या शास्त्रीय नृत्यांमध्ये देखील एक प्रकारची वेगळी शिस्त असते. मी स्वतः भरतनाट्यम नृत्यांगना आहे. मात्र आपण जेव्हा झुंबा करतो तेव्हा आपल्या हालचाली मोकळ्या आणि अधिक आनंदाच्या बनतात. 

Zumba Benefits
श्रद्धा नाईकचा यशस्वी नृत्य प्रशिक्षक ते यशस्वी युट्यूबरपर्यंतचा प्रवास

झुंबामध्ये हालचाली करताना प्रत्येक जण स्वतःतच मग्न असल्यामुळे कुणी कुणाला 'जज' करायला जात नाही. सारे वातावरण एखाद्या पार्टीसारखे असते. ती एक तासाची वेळ प्रत्येकासाठी मौजेची असते. शरीर तंदुरुस्तीसाठी नृत्यात्मक हालचाली करताना मनही तणावमुक्त होऊन जाते.

आजच्या धकाधकीच्या जीवनात त्यामुळेच झुंबासारखा व्यायाम अनेकांसाठी वरदनासारखा ठरतो आहे. झुंबामध्ये साथीला 'संगीत' हे एक विलक्षण माध्यम असल्यामुळे तो साराच अनुभव जिवंत बनतो. झुंबा हा शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मनालाही ताजेपणा देणारा व्यायाम प्रकार आहे. 

- ग्राझियेला आल्वारीस, झुंबा प्रशिक्षिका

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com