Yoga Tips: योग केल्यानंतर 'या' 5 गोष्टी नक्की करा, मिळतील अनेक फायदे

योगा केल्याने आरोग्य निरोगी राहते. पण अनेक लोकांना योगा केल्यानंतर देखील फायदा मिळत नाही. असे का होते हे जाणून घेऊया.
Yoga Tips
Yoga TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Yoga Tips: निरोगी राहण्यासाठी योगासने करणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. शरीरापासून मनापर्यंत सर्व काही निरोगी राहते. यामुळे तुम्ही स्वतःला उत्साही ठेऊ शकता. एकूणच योगाचे अगणित फायदे आहेत. आजच्या काळात बहुतेक लोक योगासने करतात पण यादरम्यान काही चुका होतात. ज्यामुळे त्यांना योगाचा पूर्ण लाभ मिळत नाही. चला जाणून घेऊया योग केल्यानंतर काय केले पाहिजे जेणेकरून तुम्हाला पूर्ण लाभ मिळू शकेल.

  • योगाचे फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही योगा केल्यानंतर काही वेळ स्वतःला आराम करता. कामाच्या घाईत योगासने करून कामाच्या दिशेने वाटचाल करणारे अनेक जण आहेत. यामुळे तुमचा ताण कमी होण्याऐवजी वाढू शकतो. योगानंतर नेहमी आराम करा. थोडा वेळ बसा आणि नंतर काही काम करा.

  • योगासन केल्यानंतर हलके चालावे. यामुळे तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. चालताना तुमचे शरीर मोकळे राहते. आपण मुक्तपणे श्वास घेण्यास सक्षम आहात. अशा प्रकारे तुमचे शरीर अधिक सकारात्मकता शोषून घेऊ शकते. यामुळे योगासन करताना येणारा थकवा दूर होतो.

  • योगासन करताना घाम आला तर शरीरात निर्जलीकरण होते. योगानंतर लगेच नव्हे तर 15-20 मिनिटांनी पाणी प्यावे.

  • योगा केल्यानंतर अर्ध्या तासानंतर प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा जेणेकरून तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहील. तुम्ही टोफू, चीज, काजूचे सेवन करू शकता. मोड आलेले कडधान्य खाणे देखील एक चांगला पर्याय आहे.

  • योगा केल्यानंतर आंघोळ करावी. खरं तर, जेव्हा तुम्ही योगा करता तेव्हा तुम्हाला घाम येतो. आंघोळ केल्याने योगासन करताना निघणारा घाम स्वच्छ होतो आणि त्वचेच्या समस्या दूर होतात. आंंगोळ केल्यानंतर मूड फ्रेश होतो आणि थकवाही दूर होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com