World Thrift Day 2023: 'या' टिप्सद्वारे मुलांना शिकवा पैशाचे महत्त्व

जागतिक काटकसरी दिन दरवर्षी 30 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी पैशांची बचत करणे किती महत्त्वाचे आहे याबद्दल जनजागृती केली जाते.
World Thrift Day 2023
World Thrift Day 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

World Thrift Day 2023: जागतिक काटकसरी दिन दरवर्षी 30 ऑक्टोबर रोजी भारतात साजरा केला जातो. या दिवशी पैशाची बचत करण्याचे महत्त्व सांगितले जाते. आपल्या मुलांना पैशाचे महत्त्व शिकवण्याची ही एक उत्तम संधी आहे. 

पैसे मिळवण्यासाठी किती मेहनत करावी लागते आणि चांगले जीवन जगण्यासाठी पैसा किती महत्त्वाचा असतो हे मुलांना अनेकदा समजत नाही. पण पैसे कसे वाचवायचे हे मुलांना समजावून सांगणे कठीण होऊ शकते. तुम्ही पुढील टिप्स फॉलो करून मुलांना सोप्या भाषेत पैशाचे महत्व सांगु शकता.

  • पैसे कमवण्याचे मार्ग

तुमच्या मुलांना पैसे मिळवण्यासाठी किती मेहनत करावी लागते हे शिकवण्यासाठी तुम्ही त्यांना काही घरगुती कामे देऊ शकता. यासाठी तुम्ही त्यांना ठराविक रक्कम देखील द्या. यामुळे तुम्हाला घरातील कामात मदत होईल आणि त्यांना पैसे मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात हे समजेल. यामुळे ते आपल्या कष्टाने कमावलेले पैसे निरुपयोगी गोष्टींवर वाया घालवणार नाहीत.

  • कंपाउंडिंग

पैशांची बचत करण्याबरोबरच, आपल्या मुलांना ते त्यांचे पैसे कसे वाढवू शकतात हे शिकवणे देखील महत्त्वाचे आहे. याची सुरूवात तुम्ही मनी पॉकेटने करू शकता. त्यांना शिकवा की जर त्यांनी एका महिन्यात वाचवलेल्या पैशात 10 टक्के वाढ केली तर तुम्ही त्यांना पुढच्या महिन्यात वाढ करून पैसे देणार. अशा प्रकारे ते कंपाउंडिंगबद्दल शिकू शकतील आणि चांगल्या प्रकारे पैशांची बचत करू शकतील.

  • बजेट बनवा

तुमच्या मुलांसोबत आठवड्याचे आणि महिन्याचे बजेट तयार करावे. यामुळे आठवड्याच्या किंवा महिन्याच्या सर्व गरजा मर्यादित पैशात कशा पूर्ण करायच्या हे त्यांना चांगले समजेल. याद्वारे, कोणत्या गोष्टींवर किती पैसा खर्च करणे आवश्यक आहे आणि पैसा कुठे वाचवता येईल हे त्यांना सहज समजू शकेल.

  • पिगी बँक

सध्या पैशाची बचत करणे किती महत्त्वाचे आहे हे मुलांना समजावून सांगणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांना हे समजण्यासाठी तुम्ही त्यांना पैसे सुरक्षित ठेवण्याच्या विविध मार्गांबद्दल सांगू शकता. पिग्गी बँकेत पैसे ठेवणे हे याचे उदाहरण असू शकते. हे त्यांना समजण्यास मदत करेल की ते त्यांच्या पैशासाठी जबाबदार आहेत. त्यांची काळजी घ्यावी लागेल. यामुळे त्यांच्यात जबाबदारीची भावना निर्माण होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com