World Ovarian Cancer Day 2023: ओव्हेरियन कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाचा कर्करोग हा जगभरात वेगाने वाढणाऱ्या कॅन्सरपैकी एक आहे. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की कॅन्सरचे निदान झाल्यानंतर केवळ 45 टक्के महिला पाच वर्षांपर्यंत जगू शकल्या आहेत.
याचे मुख्य कारण म्हणजे आजार झाला हे उशीर समजणे. महिलांमध्ये अंडाशय हा शरीराचा एक महत्त्वाचा भाग असतो. ज्यामुळे त्यामध्ये प्रजनन क्षमता निर्माण होते. हे गर्भाशयाच्या दोन्ही बाजूंना ओटीपोटाच्या तळाशी असते.
महिलांमध्ये दोन अंडाशय असतात. ज्या अंड्यांसोबत इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स बनवतात. गर्भाशय ही द्रवाने भरलेल्या एका बंद पिशवीसारखी असते.
गर्भाशयाच्या कर्करोगाची सुरुवात सामान्यतः महिला प्रजनन प्रणालीच्या अंडाशयात होते. महिलांच्या प्रजनन व्यवस्थेतील बीजकोशात उद्भवणाऱ्या या कर्करोगाची सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
पोटात किंवा ओटीपोटाच्या भागात पसरल्यानंतरच हे आढळून येते. यावर उपचार करणे सहसा कठीण असते आणि कधीकधी ते धोकादायक देखील ठरु शकते. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो, परंतु 50-60 वर्षांच्या महिलांना हा आजार होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो.
सुरुवातीला गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे कमी आढळतात. पण अगदी हा आजार वाढल्यास किरकोळ लक्षणे दिसू शकतात. यामुळेच अनेक महिलांना (Women) या कर्करोगाची लक्षणे समजत नाहीत.
लक्षण कोणती
ओटीपोटात दुखणे आणि गोळा येणे
वजन कमी होणे
थकवा
पाठदुखी
वारंवार लघवी करणे
पोट खराब होणे
बद्धकोष्ठता
यापैकी कोणतीही लक्षणे दोन-तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिल्यास महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.