नवरात्रीनंतर दिवाळीची चाहूल लागलेली असते. आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळी मस्त साजरी केल्यावर पण काहीतरी राहिल्यासारखं वाटतं. मग ट्रिपचा भन्नाट प्लॅन आपल्या डोक्यात शिजत असतो. मात्र कोणतं ठिकाण त्यासाठी निवडावं? यात अनेकांचा गोंधळ उडतो. त्यासाठीच आज आपण हिवाळ्यात फिरण्यासाठी उत्तम असणाऱ्या पर्यटनस्थळांविषयी जाणून घेणार आहोत. या ठिकाणांवर जाऊन तुम्ही थंडीची सुट्टी छान एन्जॉय करु शकता.
या लिस्टमध्ये सर्वात वरच्या जागेत वर्कला हे पर्यटनस्थळ आहे. तिरुवअनंतपुरम येथे वर्कला हे पर्यटनस्थळ आहे. अत्यंत सुंदर असणाऱ्या या ठिकाणाला भेट देण्यासाठी जगभरातील पर्यटक येत असतात. केरळ राज्यातील हे एकमेव पर्वतीय ठिकाण आहे. या पर्यटनस्थळाला सुंदर समुद्र किनारा लाभला आहे. या ठिकाणाला भेट दिल्याने मनशांती मिळेल व माणूस येथून पुन्हा नव्याने सकारात्मक ऊर्जा घेऊन जाऊ शकतो.
गोकर्णा हा देखील हिवाळ्यात फिरण्यासाठी उत्तम पर्याय आहे. कर्नाटकातील (Karnataka) गोकर्णा हे ठिकाण देशातील लोकप्रिय समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे. शांत-निवांत वेळ घालवायचा असेल तर या थंडीत गोकर्णाला जरूर भेट द्या. थंडीच्या दिवसांत खूप छान वातावरण या ठिकाणचे असते. गुजरातमधील मांडवीत पण तुम्ही थंडीची सुट्टी छान एन्जॉय करू शकता. ऐतिहासिक शहर अशी याची ओळख आहे. जुन्याकाळी पूर्ण तटबंदीने वेढलेले हे शहर होते. मात्र आता त्या तटबंदी नष्ट झाल्या आहेत.
पुद्दुचेरी हा देखील थंडीची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. पुद्दुचेरी हे ठिकाण फ्रेंच कॉलनी होती. त्यामुळे आजही या ठिकाणावर फ्रेंच संस्कृतीचा प्रभाव जाणवतो. हे ठिकाण समुद्रकिनारे आणि सुंदर पर्यटनस्थळांनी वेढलेले आहे. बोचऱ्या थंडीची मजा घेत तुम्ही या ठिकाणी सुट्टीचा आनंद घेऊ शकता. जैसलमेर हे राजस्थान (rajasthan) मधील पर्यटनस्थळ सोनेरी शहर (golden city) म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी खूप सुंदर ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळं आहेत. त्यामुळे या शहराची निवड फिरण्यासाठी करणे म्हणजे अविस्मरणीय अनुभव असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.