Dengue Diet: गोव्यात वाढताहेत डेंग्युचे रूग्ण; डेंग्यु झाल्यास काय खावे, काय खाऊ नये? जाणून घ्या...

Dengue Diet: डेंग्यू तापावर कोणतेही विशिष्ट उपचार उपलब्ध नसले तरी आहारात सकस आहाराचा समावेश करून हा आजार गंभीर होण्यापासून रोखता येतो.
Dengue Diet
Dengue DietDainik Gomantak
Published on
Updated on

Dengue Diet: डेंग्यू हा विषाणूजन्य ताप आहे जो एडिस डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. सध्या भारतात डेंग्यू वेगाने लोकांना आपला बळी बनवत आहे. डेंग्यूची लागण झाल्यानंतर खूप ताप, डोकेदुखी, स्नायू आणि सांधे दुखणे असे प्रकार होतात.

Dengue Diet
Home Remedies: मळमळ अन् उलटी होत असेल तर करा 'हे' घरगुती उपाय

कधी कधी डेंग्यू जीवघेणाही ठरू शकतो. डेंग्यू तापावर कोणताही विशिष्ट उपचार उपलब्ध नसला तरी आहारात सकस आहाराचा समावेश करून हा आजार गंभीर होण्यापासून रोखता येतो. कुटुंबातील एखाद्याला डेंग्यू झाल्यास काय खावे आणि काय खाऊ नये ते जाणून घेऊया...

‘डेंग्यू’चा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहर परिसर तर डेंग्यूचा हॉटस्पॉट बनला आहे. शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने रहिवाशी भयभीत झाले आहेत.

डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य खात्याने त्वरित आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अधिकृत आकडेवारी उपलब्ध झाली नसली, तरी सध्यस्थितीत शहरात ‘डेंग्यू’चे दहाहून अधिक रुग्ण असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान, साथीचे आजार नियंत्रणात आणण्यासाठी फॉगिंग आदी आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात येत आहे. अशी माहिती आरोग्य केंद्रातून उपलब्ध झाली आहे. महिन्यापूर्वी डिचोली सामाजिक आरोग्य केंद्र क्षेत्रात डेंग्यूचे सहा रुग्ण आढळले होते.

डेंग्यू मध्ये काय खावे

पपईच्या पानांचा रस

डेंग्यू ताप असल्यास पपईच्या पानांचा रस पिणे फायदेशीर मानले जाते. पपईच्या पानांमध्ये chymopapain आणि papain नावाचे एंजाइम असतात, जे रक्तातील प्लेटलेटची संख्या वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे डेंग्यूने पीडित व्यक्तीला पपईच्या पानांचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो.

Dengue Diet
Goa SGPDA: ‘एसजीपीडीए’व पालिकेकडून मासळी मार्केटची पाहणी

नारळ पाणी

डेंग्यू झाल्यास नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, अमीनो अॅसिड्स, एन्झाइम्स, व्हिटॅमिन सी यांसारखे अनेक पोषक घटक असतात, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. डेंग्यू तापामुळे शरीरात अशक्तपणा येतो, अशा परिस्थितीत नारळ पाण्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

हळद

तज्ज्ञांच्या मते डेंग्यूच्या रुग्णांनी हळदीचे सेवन करावे. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. हे चयापचय आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्याने डेंग्यूमध्ये फायदा होतो.

लिंबूवर्गीय फळे

डेंग्यू तापामध्ये किवी, संत्री यासारखी आंबट फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. त्याचे सेवन फायदेशीर मानले जाते. डेंग्यू तापामध्ये ही फळे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊन डेंग्यूपासून मुक्ती मिळते.

डेंग्यू तापात काय खाऊ नये

1. डेंग्यूच्या रुग्णांनी चहा, कॉफी, सोडा किंवा शीतपेय यासारख्या गोष्टींपासून दूर राहावे. यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. डेंग्यू तापामध्ये हे हानिकारक ठरू शकते.

2. डेंग्यूमध्ये मसालेदार अन्नापासून दूर राहावे. याचे सेवन केल्याने अॅसिडिटी आणि पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात. तापातून बरे होण्यातही समस्या येऊ शकतात.

3. डेंग्यूच्या रुग्णांना तळलेले पदार्थ देऊ नयेत. यामुळे चरबी वाढते आणि प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. असे झाल्यास ताप उतरवणे कठीण होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com