Monkey Fever: कर्नाटकात मंकी फीवरचा कहर! जाणून घ्या लक्षणे अन् उपाय

Monkey Fever: कर्नाटकसह देशातील इतर अनेक शहरांमध्ये मंकी फीव्हरचा धोका वाढला असून जाणून घेऊया याचे लक्षणे आणि उपाय काय आहेत.
Monkey Fever
Monkey FeverDainik Gomantak

what is monkey fever read symptoms and remedies

गेल्या काही दिवसांपासून देशभरात मंकी फीवरचा धोका आहे. अलीकडेच कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यात मंकी फीवरची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत या विषाणूच्या एकूण 49 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. कर्नाटक व्यतिरिक्त, त्याची प्रकरणे महाराष्ट्र आणि गोव्यातही दिसून आली आहेत. अशावेळी या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता आरोग्य विभागाचे अधिकारी सक्रिय झाले असून त्याला तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मंकी फीवर म्हणजे काय, हा रोग कसा पसरतो आणि त्याची लक्षणे काय आहेत हे जाणून घेऊया.

मंकी फीवर म्हणजे काय?

मंकी फीवर हा फ्लॅविविरिडे कुटुंबातील एक विषाणू आहे. ज्याला वैद्यकीय भाषेत कायसनूर फॉरेस्ट डिसीज (KFD) म्हणतात. हा गंभीर आजार माकडांच्या शरीरात आढळणाऱ्या टिक्सच्या चाव्याव्दारे मानवांमध्ये पसरू शकतो. याशिवाय या विषाणूची लागण झालेल्या प्राण्याच्या संपर्कात आल्यास मंकी फीवरला बळी पडतो.

लक्षणे कोणती

ताप येणे

डोळ्यांना सूज आणि वेदना होणे

खूप थंड वाटणे

तीव्र स्नायू वेदना आणि पेटके

अंगदुखी

सर्दी आणि खोकल्याची समस्या

डोकेदुखी

उलट्या आणि मळमळ

रक्तस्त्राव होणे

प्लेटलेट्स कमी होणे

उपाय कोणते आहेत

या गंभीर आजारापासून बचाव करण्यासाठी, त्याची लक्षणे दिसू लागताच तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मंकी फीवर टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे त्याची लस होय. त्यामुळे तपासणीनंतर लसीकरण करून घ्यावे. याशिवाय ज्या भागात या आजाराचे रूग्ण आहेत अशा भागात राहणाऱ्या लोकांनी विशेषत: वेळोवेळी याची तपासणी करत राहावे. या व्यतिरिक्त स्वच्छतेची विशेष काळजी घ्या आणि टिक्स टाळण्यासाठी हात पाय झाकून ठेवा आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घालावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com