Chaitra Navratri Fast: चैत्र नवरात्रीच्या उपवासात काय खावे अन् काय टाळावे

उपवासा दरम्यान अशक्तपणा टाळण्यासाठी काय खावे हे जाणून घेउया.
Fruits for Chaitra Navratri Fast
Fruits for Chaitra Navratri FastDainik Gomantak
Published on
Updated on

Diet Tips for Chaitra Navratri Fasting: चैत्र नवरात्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. वर्षात चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र असे दोन मुख्य नवरात्र असतात. नवरात्रीमध्ये दररोज भक्त दुर्गामातेच्या नऊ अवतारांची पूजा करतात.

काही भाविक या काळात नऊ दिवस उपवास करतात. तर काही लोक पहिल्या दिवशी आणि अष्टमीला असे दोन दिवस उपवास ठेवतात. या दरम्यान खाण्या- पिण्याबाबत अनेकदा लोकांचा गोंधळ उडतो. चला तर मग जाणून घेउया की कोणत्या पदार्थांचे सेवन करावे.

  • उपवासात कोणते पदार्थ खावेत

तुम्ही नवरात्रीचा उपवास करत असाल तर दूध किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ शकतात. दुधापासून तुम्ही अनेक प्रकारचे शेक आणि स्मूदी बनवू शकता. आपल्याला मधुमेह असल्यास, आपण गूळ, मध, खजूर किंवा स्टीव्हिया सारख्या नैसर्गिक साखरेचा पर्याय वापरू शकता.

यासोबतच जेवणात दही, ताक किंवा रायता यांचा समावेश करा. कारण ते उपवासाच्या वेळी पचनाच्या समस्या टाळतील आणि तुमची एनर्जी लेव्हल देखील जास्त ठेवतील. प्रथिनांच्या सेवनासाठी पनीरचा आहारात समावेश करावा.

उपवासाच्या काळात भरपूर फळे आणि भाज्या खावे. बटाटे, रताळे, दुधी भोपळा, पालक, काकडी, गाजर आणि केळी, सफरचंद, टरबूज, पपई, द्राक्षे अशा सर्व प्रकारच्या फळांचा समावेश करावा.

वरईचा भात किंवा भगर, कुट्टूचे पीठ, साबुदाणा, राजगिरा, शिंगाड्याचे पीठ हे पराठा, पुरी, पकोडे, चीला आणि आपला आवडता पदार्थ बनवण्यासाठी खूप उपयोगी पडेल.

नवरात्रीच्या उपवासात सैंधव मीठ खावे. याशिवाय जिरे, लवंग, दालचिनी यांसारख्या मसाल्यांचाही समावेश करू शकता. कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मसाले आवश्यक आहेत.

ड्राय फ्रूट्स (Dry Fruits) हे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांचे भांडार आहेत. नवरात्रीच्या आहारात ड्रायफ्रूट्सचा समावेश करा. तुम्ही दिवसभरात मूठभर अक्रोड, बदाम, खजूर, पिस्ता आणि मनुका खाऊ शकता.

Fruits for Chaitra Navratri Fast
Chaitra Navratri 2023: नवरात्रीच्या उपवासात गर्भवती महिलांनी घ्यावी 'अशी' काळजी
  • उपवासात कोणत्या पदार्थांचे सेवन करु नये

नवरात्रीत तामसिक खाद्यपदार्थ खाण्यास मनाई आहे. यामध्ये कांदा आणि लसूण यांचा समावेश आहे. त्यांचा आपल्या नवरात्रीच्या (Navratri) आहारात समावेश करू नये.

उपवासाच्या काळात गहू, तांदूळ, मैदा, रवा, मक्याचे पीठ असे नियमित पीठ आणि सर्व प्रकारचे शेंगा आणि डाळी असे टाळा.

नवरात्रीच्या उपवासात नियमित मीठ, हळद, कढीपत्ता, कोथिंबीर, मोहरी खाऊ नये.

या सर्व गोष्टींसोबतच दारू, अंडी, मांस या सर्व गोष्टी निषिद्ध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com