अत्याचार एवढ्यापुरताच आपण ‘द ट्रायल’ या नाटकाचा विषय सीमित ठेवू शकत नाही

शक्तिशाली असल्यामुळे सत्याचा आभास निर्माण करू पाहतात. इतकेच काय तर सरकारी वकीलसुद्धा या व्यवस्थेचा बळी पडतो
The Trial

The Trial

Dainik Gomantak
Published on
Updated on

विकास कांदोळकर रभ मिलिंद कारखानीस यांनी अनुवादीत केलेल्या ‘द ट्रायल’ (मूळ लेखक अधीर भट आणि गेरी अर्ल रोस) या नाटकाचा प्रयोग राजहंस क्लब, पणजी, या संस्थेतर्फे सादर करण्यात आला. नाटक ‘स्टेट व्हर्सेस मालती म्हस्के’ या सिनेमावर (cinema) आधारित असल्यामुळे नाटकातील घटना आणि इतर गोष्टींचे बरेच साम्य आढळते. मालती म्हस्के या दलित मुलीवर तिच्या मालकिणीचा, काव्या आळेकरचा खून केल्याचा आरोप आहे. पतीच्या निधनानंतर वकिलीचा अभ्यास करून आपले कर्तृत्व सिद्ध करणारी तारा कांबळे, एनजीओच्या विनंतीवरून मालती खटला आपल्याकडे घेते.

या केसमध्ये सर्व पुरावे मालती म्हस्केच्या विरोधात आहेत. ताराला खुनाच्या मागील सत्य शोधण्याचे आव्हान आहे. सत्याचा शोध घेण्याच्या या प्रवासात तारा डॉक्टर वझीरच्या सहाय्याने केसचे ‘सायको अ‍ॅनालिजिस’ पद्धतीने विश्लेषण करून मालतीला निर्दोष सोडविते.

अत्यंत साध्या आणि मुद्देसुद पद्धतीने ‘द ट्रायल’ या नाटकाची (Drama) संहिता लिहिली गेली आहे. वास्तविकतेच्या जवळ जाणारे कथानक आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. केवळ सवर्णांनी केलेला दलितांवरील अत्याचार एवढ्यापुरताच आपण ‘द ट्रायल’ या नाटकाचा विषय सीमित ठेवू शकत नाही. कारण मालतीच्या आयुष्यात सुरवातीला तिच्या आईच्या प्रियकरापासून मानसिक आणि शारीरिक शोषण झाले आहे. अहंकार आणि दांभिकता भरभरून असणाऱ्या तथाकथित उच्चभ्रू वर्गावर कडाडून हल्ला करणाऱ्या या नाटकात निराधार आणि गरिबीत असणाऱ्या मालतीचे सदोदित शोषण होत आले आहे.

<div class="paragraphs"><p>The Trial</p></div>
नोकऱ्यांची विक्री : यात नवल ते काय?

चैतवा दीक्षित आणि काव्या आळेकर यांच्या दृष्टीने मालती एक अशिक्षित, मतिमंद मोलकरीण आहे. काव्या तिला आपल्या दडपलेल्या आसुरी आणि अनैसर्गिक कामवासनेची बळी बनवते. आपली जवळची मैत्रीण काव्या आळेकर एका दलित आणि मोलकरीण असलेल्या मालतीशी संबंध प्रस्थापित करते, या गोष्टीचा राग अनावर होऊन झालेल्या भांडणात चैतवा दीक्षितकडून काव्याचा खून होतो. पण, हे सत्य लपवून काव्याची खुनी मालती आहे, हे न्यायालयात सिद्ध करण्यासाठी बराच खटाटोप केला जातो. सत्ताधीश, दडपलेल्या वासनांच्या गर्तेत असणारे, नोकरशाही वर्ग व वरून चांगले वाटणारे सर्व लोक, मालतीला खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून, तिला शिक्षा देण्यास आसुसलेले असतात.

शक्तिशाली असल्यामुळे सत्याचा आभास निर्माण करू पाहतात. इतकेच काय तर सरकारी वकीलसुद्धा या व्यवस्थेचा बळी पडतो. या सर्व शक्तिशाली वर्गासमोर नगण्य असलेल्या मालतीला, तिच्या वर्गातील संघर्षवान महिला वकील तारा कांबळे यांच्यामुळे न्याय मिळतो व तिची मुक्तता होते. पण, न्यायालयात (Court) असलेल्या खटल्यामुळे समाज जीवनातील गुंतागुंत, शिक्षा झालेल्या किंवा सुटलेल्या आरोपींची मानसिक स्थिती, बाहेरून सुसंस्कृत, सुशिक्षित आणि सभ्य असणाऱ्या माणसांचे घ्रुणास्पद वर्तन, या प्रश्नांची मनातील घालमेल तशीच राहते. नाटकाचा शेवट वरील प्रश्नांचे आकलन करण्यास प्रवृत्त करतो.

दिग्दर्शक (Director) मयुर मयेकर यांनी दोन पातळ्यावर अर्थ निश्चिती करताना, एका बाजूला नाटकाचा सर्वसाधारण परिणाम दाखवून, दुसऱ्या बाजूस कथानकाच्या मूळ घटकांतून सुश्म विश्लेषण करून अपेक्षित परिणाम साधला. नाटकाअंतर्गत संघर्षाचे स्वरुप त्यांनी दृश्य, श्राव्य आणि गती यांचा योग्य मेळ साधत उलगडले. कलाकारांची निवड करताना त्यांनी विशेष लक्ष दिल्याचे जाणवते. दृश्यांची मांडणी करताना त्यांनी नाटकातील प्रसंग आणि पात्रे, पात्रांचा स्वभाव, आंतरिक हेतू, नटांच्या जागा, हावभाव यावर लक्ष दिल्याचे दिसले. ‘सांगण्यातून’ सादर केलेला नाटकाचा काही भाग किंचित गतिरोधक वाटला.

<div class="paragraphs"><p>The Trial</p></div>
अनेक कलांचा संगम साधणारी माशेलची महाशाला

सौमित्र बखले यांची नेपथ्य रचना चांगली. विशेषत: काळे ठोकळे आणि प्रसंगानुरूप बदलणारे साधे आणि सुटसुटीत नेपथ्य आवश्यक परिणाम साधून गेले. एक-दोन वेळा बदलाच्या वेळी घाई दिसून आली. वासुदेव चोपडेकर यांची प्रकाशयोजना ठीक होती. हाताळणीत थोडी गडबड झाली. मालतीच्या कैदेतील प्रवेश छान. ‘मॅजेंटा’ रंगाचा सुचक उपयोगाने परिणाम साधला.

सचिन चौगुले आणि समीक्षा सावंत यांचे पार्श्वसंगीत प्रयोगास पूरक असे होते. वेशभूषा दीपलक्ष्मी मोघे यांची तर रंगभूषा मार्क फर्नांडिस यांनी केली. माधुरी शेटकर यांनी वकील तारा कांबळे ही भूमिका साकार केली. कोर्टातील आपले वकिली मुद्दे त्यांनी आपल्या कृती आणि संवादातून छानपणे आणि ठळकपणे मांडले. मनोविकारी मालतीशी बोलताना थोडा ‘सायकॉलॉजी’चा अभ्यास करायला हवा होता. काही वेळा संवादांमध्ये अडथळा आला.

वकील देशपांडेच्या व्यक्तिरेखेत सलील नाईक शोभून दिसले. त्यांच्या हालचाली, हावभाव, स्वभावसूचक तपशिलपूर्ण कृती आणि आवाजाची ‘क्वालिटी’ चांगली होती. नामदेव म्हस्केची भूमिका सौरभ कारखानीस यांनी विशेष बारकाव्यांसह पेश केली. मालती मस्के ही मध्यवर्ती भूमिका अनुजा पुरोहित यांनी वठवली. त्यांनी वेशभूषा, शारीरक लकबी, संवाद्फेकीद्वारे आपल्या भूमिकेचे आंतरीक स्वरुप शोधताना संवादामध्ये असलेला ‘सब्टेक्स्ट’ हुडकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले. समीर आळेकरच्या भूमिकेत सचिन चौगुले उठून दिसले. नेहा अग्नी यांनी काव्या आळेकर तर दीपलक्ष्मी मोघे यांनी चैतवा दीक्षित ह्या भूमिका त्यामधील बारकाव्यासहित साकारल्या. मानवी व्यवहार, ज्ञान, राहणीमान, समज, जगाची माहिती, लैंगिक व्यवहार अशा सर्व पातळींवर ‘निरागसपणाचा’ बळी घेणाऱ्या आजच्या नवश्रीमंत, ढोंगी आणि आपमतलबी स्रियांच्या भूमिका त्यांनी हुबेहुब वठवल्या. जयेश बागकर यांनी रंगवलेला रघुभाऊ विशेष दाद देऊन गेला.

त्यांच्या कृतिप्रेरक संवादातून त्यांनी रघू भाऊचा आंतरिक हेतू, भावना यांच्या अभिव्यक्तीचा प्रत्त्यय जाणवला. त्यांनी भूमिकेचा अत्यंत बारकाईने अभ्यास केलेला जाणवला. सिद्धेश झांट्ये यांनी डॉक्टर वजीरच्या भूमिकेला योग्य न्याय दिला. सिद्धार्थ आळेकरची छोटीशी व्यक्तिरेखा केशवराव राणे यांनी व्यवस्थितपणे साकारली. मयुर मयेकर यांचा धीरगंभीर आवाज ‘जज्ज’च्या भूमिकेस अतिशय योग्य वाटला.

वास्तविकतेच्या जवळ जाणारे कथानक आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. केवळ सवर्णांनी केलेला दलितांवरील अत्याचार एवढ्यापुरताच आपण ‘द ट्रायल’ या नाटकाचा विषय सीमित ठेवू शकत नाही. कारण मालतीच्या आयुष्यात सुरवातीला तिच्या आईच्या प्रियकरापासून मानसिक आणि शारीरिक शोषण झाले आहे. अहंकार आणि दांभिकता भरभरून असणाऱ्या तथाकथित उच्चभ्रू वर्गावर कडाडून हल्ला करणाऱ्या या नाटकात निराधार आणि गरिबीत असणाऱ्या मालतीचे सदोदित शोषण होत आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com