Water Heater Rod
Water Heater RodDainik Gomantak

Water Heater Rod: पाणी गरम करण्यासाठी वॉटर हिटर रॉड वापरताय? मग फॉलो करा सेफ्टी टिप्स

हिवाळ्यात पाणी गरम करण्यासाठी तुम्ही रॉडचा वापर करत असाल तर थोडी काळजी घेणे गरजेचे आहे.
Published on

Water Heater Rod: हिवाळ्यात अनेक लोक गरम पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. पण पाणी गरम करण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा वापर करतात. बरेच लोक बाथरूममध्ये गिझरने पाणी गरम करतात, तर बरेच लोक पाणी गरम करण्यासाठी वॉटर हीटरच्या रॉडचा वापर करतात. 

गीझर बसवणे खूप महाग आहे. त्यामुळे बहुतेक लोक फक्त वॉटर हीटर रॉड वापरतात. पण, वॉटर हीटर रॉडने पाणी गरम करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.

  • वॉटर हीटर रॉड वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • चांगल्या रॉचा वापर

स्वस्त रॉडचा वापर केल्याने शॉर्ट सर्किट होण्याचा धोका अधिक असतो. आपण नेहमी नवीन आणि चांगले रॉड वापरले पाहिजे. जर तुम्ही 2 वर्षापेक्षा जुना रॉड वापरत असाल तर ते आधी इलेक्ट्रिशियनला दाखवले पाहिजे.

  • पाण्यात टाकल्यावरच चालू करावा

जर तुम्ही रॉडच्या मदतीने पाणी गरम करत असाल तर रॉड पाण्यात टाकल्यावरच सुरू करावा. जर तुम्ही ते आधी चालू केले तर विजेचा धक्का बसण्याचा धोका असतो. पाण्यात टाकल्यानंतरच ते चालू करणे योग्य ठरते.

Water Heater Rod
Vastu Tips: नवे काम सुरू करताना फॉलो करा 'या' वास्तू टिप्स
  • प्लॅस्टिकच्या बादलीचा वापर करावा

​​वॉटर हीटरच्या रॉडला विजेचा धक्का लागण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे लोखंड, स्टील किंवा कोणत्याही धातूच्या बादलीत वापर करणे टाळावे. यामुळे नेहमी पाणी गरम करण्यासाठी नेहमी प्लास्टिकची बादली वापरावी. रॉड नेहमी बादलीच्या तळाच्या वर ठेवा.

  • पाण्याचे हात घालू नका

वॉटर हिटर रॉड पाण्यात टाकल्यावर त्यात हात टाकणे चुकीचे आहे. असे केल्याने विजेचा शॉक लागण्याची शक्याता असते. पाण्यातून रॉड काढून टाकल्यानंतरच पाण्याचे तापमान चेक करावे.

  • पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या

रॉड काढल्यानंतरच पाण्याचे तापमान चेक करावे

अर्धी बादली पाण्यात रॉड टाकू नका. दिलेल्या चिन्हापर्यंत पाण्यात टाकावे.

रॉड खराब झाल्यास त्याचा वापर करू नका.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com