Increase Profits In Business: बिझनेसमध्ये प्रगती हवी असेल तर फॉलो करा 'या' वास्तु टिप्स

Increase Profits In Business: वास्तुशास्त्रानुसार फ्रेश आणि काटे नसलेली फुले नेहमी दुकानात आणि ऑफिसमध्ये ठेवल्यास यश मिळू शकते.
Business Idea
Business Ideadainik gomantak

Increase Profits In Business: आपल्या जीवनात वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व आहे. कारण आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी वास्तुदोष असेल तर आपल्या जीवनात दारिद्र्य येते. तसेच अशा लोकांच्या जीवनात प्रगती होत नाही. कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव निर्माण होतो. याशिवाय कुटुंबातील सदस्यही आजारी राहतात. तुम्हाला जर बिझनेसमध्ये यश मिळवायचे असेल तर काही उपाय नक्की करून पाहावे.

असे फोटो लावू नका

वास्तुशास्त्रानुसार टायटॅनिक सारख्या बुडणाऱ्या जहाजाचे चित्र चुकूनही कोणत्याही ऑफिसमध्ये किंवा दुकानात लावू नका. असे केल्याने बिझनेसमध्ये यश मिळत नाही. उत्पन्नावरही परिणाम होतो. ऑफिसमध्ये तुमच्या सीटच्या मागे पर्वतांचा फोटो लावा. तसेच कार्यालयात दररोज श्री सूक्त किंवा लक्ष्मी सहस्रनामाचे पठण करावे.

शटरला पाय लावू नका

दुकानाचे शटरही पायाने बंद करत असाल तर ते चुकीचे आहे. असे केल्याने वास्तुदोष निर्माण होतात. तसेच शटर किंवा कुलूप हळूहळू लाथ मारल्याने दुकानाच्या विक्रीवर परिणाम होतो. त्यामुळे शटर पायाने बंद करू नये.

हे रोप ठेऊ नका

कॅक्टस, बोन्साय यासारखे काटेरी झाडे दुकाने, कार्यालये किंवा संस्थांमध्ये सजावटीसाठी कधीही लावू नका. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा राहते. याशिवाय वास्तूही वाईट दिसते आणि बिझनेस मंदावतो. त्यामुळे अशी झाडे लावू ऑफिसमध्ये ठेऊ नका.

मिठाच्या पाण्याचा वापर

जर तुम्हाला बिझनेसमध्ये यश मिळत नसेल आणि व्यवसाय संथगतीने चालला असेल तर तुम्ही दररोज दुकान किंवा ऑफिस साफ करताना पाण्यात थोडे मीठ मिक्स करावे. हे खारट पाणी दुकानातील 'नकारात्मक' ऊर्जा काढून टाकण्यास उपयुक्त आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com