भारतातील 'या' शहरातील नाईट लाइफ करते तरुणांना आकर्षित

चला जाणून घेऊया कोणत्या शहरांत जास्त प्रमाणात एंजॉय केली जाते लाइट लाइफ.
Nightlife in this city in India attracts youngsters
Nightlife in this city in India attracts youngstersDainik Gomantak
Published on
Updated on

आजच्या युगात नाईट लाइफकडे तरुणाई मोठ्या प्रमाणात आकर्षित होऊ लागली आहे. त्यासाठी तरूण वर्ग खूप भटकंतीही करतो. पूर्वी फक्त काही शहरे नाईट लाइफसाठी ओळखली जात होती, परंतु आजच्या काळात अशी अनेक शहरे आहेत जिथे नाईट लाइफ तरुणांना आकर्षित करते. (Nightlife in this city in India attracts youngsters)

जयपूर

नाइट लाइफ म्हणजे रात्रीच्या वेळी मोठ्या आवाजात संगीत आणि जोशीले तरुण आणि त्यांच्या हातात जामचा ग्लास. चला जाणून घेऊया कोणत्या शहरांत जास्त प्रमाणात एंजॉय केली जाते लाइट लाइफ. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये तुम्ही ऐतिहासिक वास्तूंसह नाइटलाइफचा आनंद घेऊ शकता. जयपूरच्या मिडनाईट बाजाराने नाईटलाइफचे आकर्षण वाढवले ​​आहे.

मुंबई

मुंबईची नाईट लाईफ तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. येथील नाईट लाईफ केवळ पब किंवा डिस्क्सोपुरती मर्यादित नाही. त्याऐवजी, तुम्ही मरीन ड्राइव्ह, चौपाटी बीच, नरिमन पॉइंट, फोर्ट रोड, लॉंग ड्राइव्ह, नृत्य, मद्यपान, समुद्रकिनारी फिरणे, रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाबे आणि रेस्टॉरंटमध्ये रात्रीचे जेवण इत्यादींचा आनंद घेऊ शकता.

कोलकाता

रसगुल्ला आणि हावडा ब्रिज व्यतिरिक्त, कोलकाता नाईटलाइफसाठी देखील प्रसिद्ध आहे. कोलकात्यातील जीवन दिवसा खूप व्यस्त दिसते, मात्र रात्री ते अधिक सुंदर होते. यामुळेच या शहराला कोलकाता दिवसा काहीतरी आणि रात्री काहीतरी वेगळे असे म्हणतात. कोलकातामध्ये नाईट क्लब, पब, डान्स बार मोठ्या प्रमाणात आहेत.

गोवा

पार्टी आणि नाईट लाइफचा विचार केला तर गोव्याबद्दल बोलल्याशिवाय चर्चा अपूर्ण राहील. गोव्याचा समुद्रकिनाराच नाही तर नाईट लाइफ देखील तरुणांना खूप आकर्षित करते. तुम्ही गोव्यात असाल आणि पार्टीचा पूर्ण आनंद घ्यायचा असेल तर अंजुना बीचला भेट द्यायला कधीही विसरू नका.

बंगलोर

भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणजेच बंगळुरू आजकाल तरुणांमध्ये नाईट लाईफसाठी लोकप्रिय आहे. यामुळेच बंगळुरूला भारताची पब कॅपिटल म्हणूनही ओळखले जाते. बेंगळुरूमधील एमजी रोड पार्टीसाठी तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. येथे 50 हून अधिक पब आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com