पेडणे येथील 'रावराजे देशप्रभू' यांच्या इतिहासाची साक्ष देणारा राजवाडा

वैभवशाली पेडणे महालातील अनेक वैभवांपैकी एक म्हणजे पेडणे येथील रावराजे देशप्रभू यांच्या इतिहासाची साक्ष देणारा राजवाडा.
रावराजे देशप्रभूंचा वैभवशाली राजवाडा
रावराजे देशप्रभूंचा वैभवशाली राजवाडाDainik Gomantak
Published on
Updated on

वैभवशाली पेडणे महालातील अनेक वैभवांपैकी एक म्हणजे पेडणे येथील रावराजे देशप्रभू (Ravaraje Deshprabhu) यांच्या इतिहासाची (history) साक्ष देणारा राजवाडा ( palace). उंच कमान, भव्य समई स्तंभ, राजा, महाराणी, राजकन्या, राजकुमार यांची वेगवेगळी दालने, बसण्याची आसन व्यवस्था, स्वतंत्र दुर्मिळ इतिहास व संशोधनात्मक पुस्तकांचा खजिना, उंची फर्निचर, उंची बैठक व्यवस्था, चौकीदारांची धावपळ, सतत नागरिकांची वर्दळ हे चित्र आहे रावराजे देशप्रभू यांच्या राजमहालाचे.

रावराजे देशप्रभूंचा वैभवशाली राजवाडा
Ganpati Bappa ला चुकूनही वाहू नका हे फूल

इतिहासाची साक्ष देणारा हा राजवाडा नवीन पिढीला केवळ राजवाडा म्हणून नव्हे तर अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी एक उत्कृष्ट कलाकृती ठरेल. या सुबक महालाला भेटी देणारे देशी व विदेशी पर्यटक बारकाईने राजवाड्याची बांधणी, नक्षीकाम यावर आपापल्या नजरा फिरवित असतात आजच्या घडीला देशप्रभू मंडळी राजवाड्याची शान राखण्यासाठी अपार परिश्रम घेत असतात.

राजवाड्यात प्रवेश केल्याबरोबरच आपल्या नजरेत भरतात ते दिमाखात उभा असलेल्या सहा समई. या समईचे बांधकाम १८७४ -७५ साली झाले. पूर्वीच्या काळात नवरात्रोत्सवात त्या दर रात्री पेटवल्या जात. प्रत्येक समईत १५ लिटर तेल घातले जात असे. दर रात्री सहा समईसाठी शंभर किलो तेल लागायचे.

रावराजे देशप्रभूंचा वैभवशाली राजवाडा
Vastu Tips: गणपती बाप्पांची मनोभावे करा पूजा आणि घरावरील संकटे करा दूर

थोडं पुढे गेल्यावर आपली नजर जाते ती भव्य प्रवेश द्वारावर. या प्रवेशद्वाराची बांधणी १८१३ साली झाली होती. याला जोडूनच हत्तीचा कंबरा होता. त्याला हत्ती बांधून ठेवण्यात येई, त्या ठिकाणी सहा हत्ती ठेवण्याची व्यवस्था होती. शेवटचा हत्ती १९५३ साली वारल्यानंतर हा खाम्बारा तेथून हलविला गेला. पुढे प्रवेशद्वारातून गेल्यावर आपल्या नजरेत भरतात ते तीन वाडे... प्रवेशद्वाराला लागून असलेला गेट पेलेस, प्रमुख वाडा आणि अतिथी वाडा. त्यांचे बांधकाम अनुक्रमे १८१३, १६९३ व १८८६ साली करण्यात आले .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com