गोव्यातले सर्वात जुने चॅपल

1534 साली या चॅपलला तिसऱ्या पॉप कडून ‘कॅथेड्रल’चा दर्जा देण्यात आला.
गोव्यातले सर्वात जुने चॅपल
गोव्यातले सर्वात जुने चॅपलDainik Gomantak
Published on
Updated on

ओल्ड गोव्यात सेंट कॅथेड्रल चर्चच्या आवारातच एक लहान आणि साधे दिसणारे एक चॅपल आहे. त्याच्या आसपास असणाऱ्या इतर उत्तुंग चर्चेसमुळे त्याकडे सहसा कुणाचे लक्ष जात नाही परंतु हे चॅपल गोव्यातले सर्वात जुने चॅपल आहे. चॅपल अ‍ॅफ सेन्ट कॅथरीन! ‘सेंट फ्रान्सिस ऑफ आसीसी’ या पुरातत्त्व संग्रहालयाच्या पश्‍चिमेला असलेले हे चॅपल, आदिलशहावर विजय मिळवणाऱ्या अल्फान्सो दी आल्बुकर्कने सेंट कॅथरीनच्या स्मृती दिवसाच्या निमित्ताने पंचवीस नोव्हेंबर पंधराशे दहा साली बांधले.

गोव्यातले सर्वात जुने चॅपल
Goa Tourist: जीवरक्षकांनी वाचविला दिल्लीच्या पर्यटकांचा जीव

पंधराशे चौतिस साली या चॅपलला तिसऱ्या पॉप कडून ‘कॅथेड्रल’चा दर्जा देण्यात आला. पंधराशे पन्नास साली पोर्तुगीज गव्हर्नर जॉर्ज काब्राल यांनी या चॅपलचा विस्तार केला आणि अलिकडच्या काळात 1952 साली जांभा दगड वापरून पुन्हा त्याचा जीर्णोद्धार केला गेला. सेंट कॅथेड्रल च्या आवारात पश्चिम दिशेच्या गेटने प्रवेश करताच डाव्या बाजूला हे चॅपल आपल्या नजरेस येईल. गोव्यात दिसणाऱ्या इतर पांढऱ्याशुभ्र चॅपलच्या मानाने या चॅपलचे वेगळेपण लगेच डोळ्यात भरते. दगडी बांधकामाच्या लालसर चौकटीत असलेल्या पांढऱ्या भिंती अशा स्वरूपाचे हे चॅपल त्याच्या भोवताली गर्दी नसल्याकारणाने बिनमहत्त्वाचे वाटते पण इतिहास समजल्यानंतर या चॅपलकडे विस्फारलेली नजर अवश्य जाते.

गोव्यातले सर्वात जुने चॅपल
Goa: राज्य कदंबवाहतूक मंडळातर्फे बस चालक, कंडक्टर यांचा गौरव करण्यात आला

प्रार्थनास्थळ म्हणून युरोपमधल्या रेनेसान्स शैलीत या चॅपलचे बांधकाम झालेले आहे. चॅपलच्या दोन्ही बाजूंनी टॉवर आहेत. चॅपलच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर आयताकार खिडक्या बसवलेल्या आहेत. जुन्या पोर्तुगीज शैलीने शिंपल्यानी त्या सजलेल्या आहेत. आतमध्ये असलेल्या अल्टरवर ‘अवर लेडी ऑफ पिएटी’ चा पुतळा आहे. प्रार्थनास्थळ म्हणून हे चॅपल आज उपयोगात नाही. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून हे चॅपल नोंद केलेले आहे आणि भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे या चॅपल ची जबाबदारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com