Sobhita Dhulipala: टिंडरचा 'स्वाईप राईड' हा शो आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भारतीय महिलांना डेटिंगबाबत मार्गदर्शन करणारा हा शो असणार आहे. ३१ जुलै रोजी टिंडरच्या यूट्यूब चॅनलवर या शोचं प्रीमियर झालं. सोबतच, जिओ सिनेमावर याचं स्ट्रीमिंग करण्यात येत आहे. या शोचा दुसरा एपिसोडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री शोभिता धुलिपाला सहभागी असणार आहे. यामध्ये तिने डेटिंग करताना कोणत्या ग्रीन फ्लॅग्सकडे लक्ष द्यावं याबाबत दिलखुलासपणे गप्पा मारल्या आहेत.
लोकप्रिय सोशल मिडिया कंटेंट क्रिएटर आणि अभिनेता कुशा कपिल अॅपवरील सदस्यांना त्यांच्या डेटिंग आणि रिलेशनवर बोलण्यासाठी सेलिब्रिटींना भेटण्यासाठी पुन्हा एकदा गप्पा मारण्यासाठी येणार आहे. अलिकडेच रिलीज झालेल्या एपिसोडमध्ये शोभिता, कुशा आणि ऐश्वर्या हे डेटिंगमधील ग्रीन फ्लॅग्सच्या यादीबाबत चर्चा करत आहेत.
यामध्ये त्या हेल्दी डेटिंगविषयी देखील गप्पा मारताना दिसतात. भारतातील 70 टक्के महिला या डेटिंग अॅपचा वापर करतात. यावर त्यांना हवा तसा पाटर्नर मिळण्यास मदत मिळते. टिंडर फ्यूचर ऑफ डेटिंग अहवालामध्ये आजचे तरुण कोणत्या गोष्टींना अधिक महत्त्व देतात याची आकडेवारी जाहीर झाली आहे. यात प्रामाणिकपण (79%) आदर (78%), मोकळेपणाने बोलणे (61%) आणि रंगरूप (56%) या गोष्टींना तरुण महत्त्व देत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
धुलिपाला म्हणाली, 'डेटिंग अॅपमुळे महिलांना खरं प्रेम मिळाले आहे.तसेच त्यांची फसवणुक देखील कमी होत आहे. Tinder's Swipe Ride हे महिलांना मिळालेल्या निवडीच्या स्वातंत्र्य सेलिब्रेट करते. महिलांना या माध्यमातून मिळणारा आत्मविश्वास पाहणं हे रिफ्रेशिंग असल्याचं मत शोभिताने व्यक्त केलं.
डेटिंग करतांना कोणती काळजी घ्यावी
जेव्हा एकाद्या व्यक्तीला ऑनलाइन डेट करतो तेव्हा त्याची प्रत्येक गोष्ट तपासून पाहावी. कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास ठेऊ नका.
ऑनलाइन डेट करतांना करिअरवर मनमोकळेपणा चर्चा करावी.
ऑनलाइन डेट करताना कोणत्याही निर्णयामध्ये घाई करणे टाळावे.
ऑनलाइन डेट करतांना कुटूंबाला समजावू सांगावे. दोन्ही कुटूंबाच्या परवानगीनेच ऑनलाइन जोडीदारशी लग्न करण्याचा निर्णय घ्यावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.