Curd Rice in Summer Benefits: उन्हाळ्यात दही-भात खाणं आरोग्यदायी, दिवसभर राहाल एनर्जेटिक

उन्हाळ्यात दही-भात खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असते.
Curd Rice
Curd RiceDainik Gomantak
Published on
Updated on

Curd Rice in Summer Benefits: उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. तसेच योग्य आहार घेणे देखील महत्वाचे असते. आपल्या आहारात दह्याचा समावेश करणे फायदेशीर ठरते.

उन्हाळ्यात तुम्ही दही भाताचा समावेश करु शकता. दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. कमी वेळेत भरपूर पोषण तत्व असणारी डिश म्हणजे दही भात होय.

दही-भात खाण्यामुळे मिळणारे फायदे याबद्दल जाणून घेउया अधिक माहिती.

  1. दही भाताचा आहारात समावेश केल्यामुळे शरीर अत्याधिक एनर्जेटिक राहण्यास मदत मिळते. याशिवाय कडक उन्हामध्यापासुन बचाव करते.

  2. दह्यामध्ये प्रोबॉयोटिक्स अँटिऑक्सीडेंट आणि आवश्यक फॅट्स उपलब्ध असतात. यामुळे मेंदूत तणाव आणि वेदना निर्माण करणाऱ्या भावनांचा सामना करण्यासाठी मदत मिळते. त्यामुळे दही भाताचे सेवन केल्याने तणाव कमी होतो.

  3. तुमच्या आहारात नियमितपणे दही भाताचा समावेश केल्यास तर प्रतिकारशक्ती वाढते.

  4. तुमच्या नियमित आहारात दही-भाताचा समावेश केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. तसेच दही आणि भातामध्ये फॅटचं प्रमाण खूप कमी असते. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही याचे सेवन करु शकता.

Curd Rice
Feng Shui Vastu Tips: फेंगशुईच्या या गोष्टी घरात आणतील सुख अन् धन; जाणून घ्या

5. तुम्हाला जर ओव्हर इटिंगपासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर दही भात खाउ शकता. तसेच पचनशक्ती सुरळित ठेवण्यासाठी फायदेसीर ठरते.

6. दही-भाताचा आहारात समावेश केल्याने मेटाबॉलिज्म म्हणजेच चयापचय क्रिया सुधारण्यास मदत मिळते. यामुळे वजनही नियंत्रणात राहते

7. या डिशमध्ये आयर्न आणि मॅग्नेशियमसारखे भरपूर पोषण तत्व असतात. यामुळे शरीरातील उच्चरक्तदाबाची समस्या असणाऱ्यांना अनेक फायदे मिळू शकतात. 

8. तुम्ही जर उन्हाळ्याच्या काळात नियमितपणे दही-भात खात असाल तर आगरोग्यासाठी फायदेशीर असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com