Food Poisoning: फूड पॉइजनिंगपासून वाचायचंय? मग 'ही' लक्षणं ओळखा आणि स्वतःचं रक्षण करा

Food Poisoning In Summer: उन्हाळा ऋतू आपल्यासोबत अनेक आजार घेऊन येतो. या ऋतूतील सर्वात सामान्य आजार म्हणजे 'फूड पॉइजनिंग'. याशिवाय, पोटाशी संबंधित आजारही लोकांना घेरतात. मुले आणि वृद्धांना याचा सर्वाधिक धोका असतो.
Food Poisoning In Summer
Food PoisoningDainik Gomantak
Published on
Updated on

उन्हाळा ऋतू आपल्यासोबत अनेक आजार घेऊन येतो. या ऋतूतील सर्वात सामान्य आजार म्हणजे 'फूड पॉइजनिंग'. याशिवाय, पोटाशी संबंधित आजारही लोकांना घेरतात. मुले आणि वृद्धांना याचा सर्वाधिक धोका असतो. उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजीव वेगाने वाढतात, ज्यामुळे अनेक प्रकारचे संसर्ग होतात. यामध्ये उष्माघात, अतिसार आणि डिहाइड्रेशन यांचाही समावेश आहे.

उन्हाळ्यात (Summer) या आजारांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. WHO च्या मते, दरवर्षी जगात 60 कोटींहून अधिक लोकांना अन्नाशी संबंधित आजार होतात. यापैकी सर्वात सामान्य आजार म्हणजे फूड पॉइजनिंग. फूड पॉइजनिंग झाल्यास, स्टॅफिलोकोकस किंवा ई. कोलाई बॅक्टेरियाच्या संसर्गाची लागण होते. याशिवाय, साल्मोनेला, स्टॅफिलोकोकी आणि क्लोस्ट्रिडियम बोटुलियम सारखे जंतू देखील संसर्ग निर्माण करतात. क्लोस्ट्रिडियम बोटुलिअममुळे होणारा संसर्ग सर्वात धोकादायक मानला जातो.

Food Poisoning In Summer
Heart Attack Prevention Tips: हृदयविकार टाळण्यासाठी आहारात काय बदल करावे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

लक्षणे

फूड पॉइजनिंगमुळे पोटात तीव्र वेदना होतात. पीडित व्यक्ती शौचास वारंवार जातो, पण पोट साफ झाल्यासारखे त्याला जाणवत नाही. यासोबतच डोकेदुखी, चक्कर येणे आणि उलट्या देखील होऊ शकतात. याशिवाय, डोळ्यांसमोर अंधारी आल्यासारखे वाटते.

Food Poisoning In Summer
Heart Health Tips: तुम्ही काय खाताय यावर ठरतं हृदयाचं आरोग्य; 'या' 5 गोष्टी करतील हृदयविकारांपासून संरक्षण

प्रतिबंधात्मक उपाय

उन्हाळ्यात होणारे आजार टाळण्यासाठी खाण्यापिण्याच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. काहीही खाण्यापूर्वी हात चांगले धुवावेत. शिळे अन्न खाणे टाळावे, जास्त तळलेले आणि जंक फूड टाळावे. फूड स्टॉलवरील तळलेले पदार्थ अनेकदा खाण्याची इच्छा होते, पण ते तुमच्या आरोग्यासाठी (Health) चांगले नाहीत. म्हणून रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. तसेच, स्वतःला हायड्रेटेड ठेवून दिवसभरात 6 ते 8 लिटर पाणी प्यावे. अल्कोहोल आणि कॅफिन सारख्या पदार्थांपासून दूर राहा. हे पदार्थ केवळ डिहाइड्रेशनचे कारण बनू शकत नाहीत तर इतर अनेक आजारांना देखील कारणीभूत ठरु शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com