परिक्षेची तयारी करताय, टेंशन आलंय? 'या' Study Tips करतील मदत

Study Tips: प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते, पण अशा काही टीप्स आहेत, ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना मदत करू शकतात.
Study Tips
Study Tips
Published on
Updated on

Study Tips: परिक्षा म्हटलं तरी अनेकांना टेंशन येतं. आता काही महिन्यातच १० वी-१२ वीच्या परिक्षाही सुरु होतील. दरम्यान, परिक्षेसाठी तयारी करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते.

कोणाला पहाटे उठून, तर कोणाला रात्री अभ्यास करण्याची सवय असू शकते. पण असे असले तरी काही ट्रिक्स आहेत, ज्या अभ्यासात विद्यार्थांना मदत करू शकतात. त्यामुळे अभ्यास अधिक सोपा होऊ शकतो.

स्वत:च्या आभ्यासाची पद्धत शोधा

प्रत्येकाची अभ्यासाठी सवय वेगळी असते, त्यामुळे तुमची स्वत:ची पद्धत शोधा. काहींना धडे वाचल्यानंतर किंवा एखादा विषय समजून घेतल्यानंतर त्याबद्दलच्या महत्त्वाच्या नोट्स काढून ठेवण्याची सवय असते. काहींना गाणी ऐकून अभ्यास करण्याती सवय असते.

काहींना लेक्चर ऐकून किंवा पाहून लक्षात राहाते. काहींना एखाद्या विषयाचा अभ्यास करत असतानाच महत्त्वाच्या गोष्टी नोटडाऊन करण्याची सवय असते. त्यामुळे तुमची स्वत:ची पद्धत शोधा. कारण त्यानुसार तुम्ही आभ्यासाचे नियोजन करू शकता.

Study Tips
Parenting Tips: मुल मोठ्यांशी गैरवर्तन करत असतील तर 'या' पद्धतींचा करा वापर

मदत मागा

बऱ्याचदा आपण कोणत्याही गोष्टीबद्दल मदत मागायला कचरतो. मात्र, जर योग्य गोष्टींसाठी योग्य व्यक्तीकडे मदत मागितली, तर त्याचा फायदा होऊ शकतो.

अभ्यासाबाबतही तुम्हाला कोणताही विषय समजायला अवघड जात असेल, तर तुम्ही शिक्षकांकडे, पालकांकडे किंवा अगदी तुमच्या मित्रांकडेही मदत मागू शकता. त्यामुळे एकतर तुम्हाला तो विषय सहज समजेल आणि त्यामुळे अभ्यास करताना फायदाही होईल.

वेळ पाळा

तुम्हाला ज्या वेळेला अभ्यास करायला आवडतो, ती वेळ निश्चित करा आणि ती वेळ काटेकोरपणे पाळा. नियमित नियोजित वेळेत अभ्यास केला, तर ऐन परिक्षेच्या वेळेला दबाव येणार नाही.

नियोजन करा

कोणतीही गोष्ट नियोजन करून केली की ती चांगल्याप्रकारे होते. अभ्यासाबाबतही तसेच आहे. तुमच्या दैनिंदैन गोष्टींचा विचार करून एक वेळापत्रक तयार करा.

आपला आभ्यासक्रम काय आहे, कसा आहे, कधी कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, कोणत्या विषयाच्या अभ्यासाला किती वेळ लागणार आहे, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन अभ्यासाचे नियोजन करा. त्यामुळे गोंधळ कमी होईल.

Study Tips
Gmail Tips: ई-मेल शेड्यूल करण्यासाठी 'अशी' करा सेटिंग, आपोआप जातील मेल

आयत्यावेळी आभ्यास करू नका

काहींना सवय असते की परिक्षा अगदी तोंडावर आली की अभ्यासाला सुरुवात करण्याची. यामुळे अनेकदा घाईगडबड होते आणि नक्की काय अभ्यास करायचा आहे, हे समजत नाही.

त्यापेक्षा आधीपासूनच थोडा थोडा अभ्यास सुरु करा आणि परिक्षेच्या वेळी झालेल्या अभ्यासाची उजळणी करा. यामुळे खूप गडबडही होणार नाही आणि काय अभ्यास झालाय आणि कोणत्या विषयाच्या अभ्यासाची अधिक गरज आहे, हे देखील लक्षात येईल आणि त्यावर लक्ष केंद्रित करता येईल.

स्वत:ला शबासकी द्या

पाठीवर कौतुकाची थाप आत्मविश्वास निर्माण करते. त्याचमुळे स्वत:ला शबासकी द्यायलाही विसरू नका. ठरवलेल्या वेळेत ठरवलेला अभ्यास झाला की स्वत:चे कौतुक करा. हवं तर एखादं छोटं बक्षीस स्वत:लाच द्या. त्यामुळे आणखी अभ्यास करण्याची इच्छा होईल आणि अभ्यास करणे कंटाळवाणेही वाटणार नाही.

योग्य आहार आणि विश्रांती घ्या

परिक्षा देत असताना तुम्ही निरोगी असणे महत्त्वाचे असते. कारण जरी तुम्ही कितीही अभ्यास केला असला, तरी जर तुमचे आरोग्य परिक्षेच्यावेळी चांगले नसेल, तर तुम्ही परिक्षा चांगल्याप्रकारे देऊ शकणार नाहीत. त्यामुळे परिक्षेच्या काळात आहाराची काळजी घेण्याबरोबरच पुरेशी विश्रांती घ्या.

त्याचबरोबर अभ्यास करतानाही सलग खूप तास अभ्यास न करता छोटी छोटी विश्रांती घेऊन अभ्यास करा, त्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना कंटाळा येणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com