Sleeping Pills Side Effects : झोपेसाठी तुम्हीही गोळ्या घेता का? मग एकदा हे नक्की वाचा

Sleeping Pills Side Effects : झोपेच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्याव्यात, पण बरेच लोक हल्ली स्वतःहून त्या घेत आहेत.
Sleeping Pills Side Effects
Sleeping Pills Side EffectsDainik Gomantak

Sleeping Pills Side Effects : वेगवान जीवनशैली आणि झोपेची कमतरता यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. झोपेच्या कमतरतेमुळे लोकांना तणाव, हृदयविकार आणि उच्च रक्तदाब होण्याची शक्यता वाढते. तणाव कमी करण्यासाठी आणि योग्य झोप घेण्यासाठी लोक झोपेच्या गोळ्यांचा अवलंब करत आहेत.

झोपेच्या गोळ्या घेणे हा लोकांच्या नित्यक्रमाचा भाग बनत चालला आहे. झोपेच्या गोळ्या दीर्घकाळ घेतल्यास आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. झोपेच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्याव्यात, पण बरेच लोक हल्ली स्वतःहून त्या घेत आहेत. (Sleeping Pills Side Effects)

Sleeping Pills Side Effects
Tea Side Effects in Winter : थंडीत तुम्हीपण सतत चहा पिता? हे आहेत त्याचे तोटे

झोपेच्या गोळ्या सतत घेतल्याने अनेक वेळा या गोळ्या काम करणे बंद करतात. चला जाणून घेऊया झोपेच्या गोळ्या सतत घेतल्याने त्याचा प्रभाव का कमी होतो आणि त्याचा शरीरावर नेमका कसा परिणाम होतो.

निद्रानाश आहे हे कारण

झोपेच्या गोळ्या सतत घेतल्याने बॉडी क्लॉकमध्ये फरक पडतो. झोपेच्या गोळ्या सतत घेतल्याने मेंदू पूर्णपणे आराम करू शकत नाही. शरीराला अंगवळणी पडेल अशा प्रकारे ते औषध म्हणून काम करते. योग्य झोप न मिळाल्याने निद्रानाश होऊ शकतो. (Sleeping Problem)

व्यसनामुळे परिणाम कमी होतो

शरीराला झोपेच्या गोळ्यांची सवय झाली की त्याचा प्रभाव कमी होऊ लागतो. झोपेच्या गोळ्यांमुळे शरीर थकलेले आणि तणावग्रस्त राहते. जर एक दिवस गोळी घेतली नाही तर मेंदू झोपेसाठी तयार होत नाही, ज्यामुळे संपूर्ण शरीराचे कार्य बिघडू शकते.

मेंदूवर परिणाम

अनेक महिने सतत झोपेच्या गोळ्या घेतल्याने मेंदूवर गंभीर परिणाम होतो. झोपेच्या गोळ्या घेतल्याने स्मरणशक्ती कमजोर होते आणि हळूहळू मेंदू काम करणे बंद करतो. इतकंच नाही तर स्मरणशक्ती कमी झाल्यामुळे अल्झायमरसारख्या आजाराची शक्यताही वाढते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com