Face Serum: फेस सीरम वापरताना 'या' चुका करू नका, अन्यथा तुमचा चेहरा होईल खराब

फेस सीरम वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जर तुम्ही याची काळजी घेतली नाही तर फेस सीरमचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर विपरीत होऊ शकतो.
Face Serum
Face SerumDainik Gomantak
Published on
Updated on

Face Serum: चेहरा चमकदार ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे प्रोडक्ट लोक वापरतात. रेडीमेड प्रोडक्टसोबतच आजकाल अनेक प्रकारचे स्किन केअर ट्रीटमेंट्सही उपलब्ध आहेत. ज्यामुळे चेहरा चमकदार बनतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी फेस सीरम मिळतात जो चेहऱ्याचा ग्लो वाढवतो. चेहऱ्यावर अधिकाधिक फेस सीरम लावल्यास चेहऱ्यावर चांगला परिणाम होईल, असे अनेकांना वाटते, पण तसे नाही. फेस सीरम वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जर तुम्ही याची काळजी घेतली नाही तर फेस सीरमचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर विपरीत होऊ शकतो.

चेहरा स्वच्छ करावा

सीरम लावताना सर्वात पहिले चेहरा स्वच्छ करावा. जर तुम्ही सीरमचा वापर फक्त अस्वच्छ चेहऱ्यावर केला तर छिद्रांमध्ये लपलेली घाण चेहऱ्यावर चिकटून राहते. यामुळे तुमचा चेहरा खराब होईल. अशावेळी चेहरा स्वच्छ केल्यानंतरच सीरम वापरा.

हाताचा वापर करावा

अनेकदा लोक घाईत ड्रॉपरद्वारे सीरम वापरतात. असे केल्याने घाण ड्रॉपरवर अडकू शकते आणि ड्रॉपरमधील घाण सीरमच्या बाटलीमध्ये जाईल. यामुळे चेहऱ्यावर इन्फेक्शन होऊ शकते.

तुमच्या त्वचेचा प्रकार

जर तुम्ही तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखून सीरम खरेदी केले नाही तर त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर विपरीत होईल. अशा परिस्थितीत सीरम खरेदी करताना तुमच्या त्वचेचा प्रकार लक्षात ठेवा.

जास्त वापरू नका

लोकांना वाटते की त्यांनी चेहऱ्यावर अधिकाधिक सीरम लावले तर त्याचा परिणाम चांगला होईल. असे केल्याने तुमची त्वचा तेलकट होऊ शकते. चेहऱ्यासाठी सीरमचे फक्त 3-4 थेंब पुरेसे आहेत.

हलक्या हातांनी लावावा

सीरम चेहऱ्यावर चोळून कधीही लावू नका. ते वापरण्यासाठी आपल्या हातावर सीरम घ्या आणि नंतर ते हलके हाताने लावावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com