
तुम्हाला अनेकवेळा काम करताना वेळ कमी पडतोय असं वाटतं का? कधीतरी सकाळी उठल्याउठल्या कामाचा भडीमार होतो आणि संध्याकाळ झाली तरीही कामाचा व्याप काही संपत नाही. अशावेळी २४ तास कमी पडतात आणि आणखीन काही वेळ मिळावा असं वाटू लागतं. घड्याळ त्याचं त्याचं काम वेळेनुसार करत असतं मात्र आपण मागे राहतो आणि त्यानंतर वैताग यायला सुरुवात होते. आज आम्ही तुम्हाला वेळ वाचवण्याचे काही सोपे उपाय सुचवणार आहोत, आणि हे जर का तुम्ही दैनंदिन जीवनात ट्राय करून पाहिलंत तर नक्कीच याचा फायदा होणार आहे.
अनेकवेळा असं होतं की आपण मोबाईल घेऊन बसतो आणि मोबाईल बघता-बघता वेळ निघून जाते आणि महत्वाचं काम राहून जातं. अशावेळी मोबाईलचं नोटिफिकेशन बंद ठेवा, तुम्हाला रिंगटोन किंवा नोटिफिकेशनचा आवाज आला नाही पाहिजे. काम करण्यासाठी अशी जागा शोधा जिथे गोंधळ कमी असेल आणि तुम्हाला कामावर लक्ष देता येईल. लॅपटॉपवर काम करत असताना बाकी सगळे टॅब्स बंद करा, ज्यामुळे कामावरून लक्ष विचलित होणार नाही.
प्रत्येक काम जर का वेळेत संपवायचं असेल तर त्याला एक मर्यादा असणं महत्वाचं असतं. यामुळे त्या चौकटीत बसणारं काम करा, यामुळे कामाचं प्रेशर जाणवणार नाही. जी कामं महत्वाची आहेत ती आधी पूर्ण करून घ्या, यामुळे काम पूर्ण होतंय याचा कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि सोपी कामं नंतर संपवणं सोपं जाईल.
आपण सध्या मल्टिटास्किंगच्या जमान्यात वावरतो, जिथे एकवेळ अनेक कामं हातात घेतली जातात. मात्र लक्ष्यात घ्या यामुळे वेळ वाचत नाही तर गडबड मात्र अधिक होऊ शकते.
तुम्ही जेवढं लक्षपूर्वक काम कराल ते तुमच्यासाठी चांगलं असेल. तुमच्या कामाची कॅलिटी वाढवायची असेल तर नियोजित काम करा.
संपूर्ण दिवसांत तुम्ही काय काम करणार आहात याचा आराखडा तयार करा. नियोजन केलेलं असल्याने आपलं किती काम झालंय आणि किती काम बाकी आहे हे पटकन समजायला मदत होते. तसंच आपल्याला कोणत्या कामासाठी कितीवेळ लागू शकतो याचा अंदाज येतो. काही दिवस न चुकता याचं पालन करा आणि नंतर आपोआप तुम्हाला याची सवय होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.