Simple Cleaning Hacks: अनेकवेळा चहा किंवा कॉफी पितांना सोफ्यावर पडते. सोफ्यावर पडलेले हे डाग काढणे खूप अवघड असते. जर तुम्हाला सोफ्यावर पडलेले डाग सहज काढायचे असतील तर पुढे सांगितलेले उपाय करू शकता. कमी वेळेत सोफा स्वच्छ होईल.
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्याचा वापर करून तुम्ही सोफा स्वच्छ करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक कप पाणी घ्यायचे आहे आणि त्यात बेकिंग सोडा मिक्स करायचा आहे. मिक्स केल्यानंतर त्यात एक चमचा शॅम्पू टाकावा. यानंतर ते पुन्हा चांगले मिक्स करावे. नंतर कापसाच्या साहाय्याने हे मिश्रण सोफ्यावर पडलेल्या डागावर लावावे. यानंतर स्वच्छ पाण्याने धुवावे. अशा प्रकारे तुम्ही हे डाग साफ करू शकता.
लिंबाचा रस
लिंबाच्या मदतीने तुम्ही सोफ्यावर पडलेले चहा-कॉफीचे डाग सहज स्वच्छ करू शकता. सर्वात पहिले स्प्रे बाटलीमध्ये दोन कप पाणी टाकावे आणि नंतर त्यात डिटर्जंट लिक्विडचे दोन थेंब मिक्स करावे. मग त्यात लिंबाचा रस टाकावा. मग तुम्हाला हा स्प्रे सोफाच्या कव्हरवर फवारायचा आहे आणि नंतर कोमट पाण्याने डाग घासून स्वच्छ करावे. यासाठी जास्त वेळ लागणार नाही आणि चहा किंवा कॉफीचे डाग नाहीसे होतील.
मीठ
सोफ्यावर पडलेले न जाणारे डाग काढून टाकण्यासाठी सर्वात पहिले बादलीमध्ये गरम पाणी घ्यावे आणि नंतर त्यात डिटर्जंट किंवा शैम्पू घालावे. यानंतर 2 चमचे बेकिंग सोडा घालावे आणि एक चमचा मीठ देखील घालावे. जेणेकरून सोफ्याचा रंग खराब होणार नाही. या पाण्याने सोफा स्वच्छ करावा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.