Shanidev Astro Tips For Life: शनिवारी 'हे' उपाय केल्यावर उजळेल आयुष्य; कधीही करू नका दुर्लक्ष

शनिदेवाला कर्माचा दाता आणि न्यायाची देवता मानण्यात आल्याने, ते एखाद्याच्या कृतीनुसार माणसाला समान फळ देतात.
Shanidev Astro Tips For Life
Shanidev Astro Tips For LifeDainik Gomantak
Published on
Updated on

Shanidev Astro Tips For Life: प्रकोपाचा सामना करावा लागू नये, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. त्यामुळे सर्वजण शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी उपाय करत असतात. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला प्रसन्न करण्याचे अनेक निश्चित मार्ग आहेत.

Shanidev Astro Tips For Life
Cycling For Weight Loss: दररोज फक्त 30 मिनिटे चालवा सायकल अन् चरबीला काय बाय-बाय; वाचा संपूर्ण फायदे

शनिदेवाला कर्माचा दाता आणि न्यायाची देवता मानण्यात आल्याने, ते एखाद्याच्या कृतीनुसार माणसाला समान फळ देतात. दुसरीकडे, शनिवार हा शनि ग्रहाला समर्पित दिवस मानला जातो. त्यामुळे शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी शनिवारीच काही उपाय करून त्यांची कृपा प्राप्त होऊ शकते. शनिदेवाच्या कृपेने भाग्य उजळते.

शनिवारी करा हे उपाय

  • शनिवारी एक ग्लास पाणी घ्या. त्यात साखर टाकून पिंपळाच्या झाडाच्या मुळास अर्पण करा. यादरम्यान ‘ओम ह्रीं श्री शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा. असे केल्याने घरात सुख-शांती नांदते.

  • शनिवारी वाहत्या पाण्यात कोळसा वाहावा. या वेळी 'शं शनिश्चराय नमः' हा जप करावा. या उपायाने व्यक्तीचे उत्पन्न वाढेल आणि नोकरीत यशाचा मार्ग मोकळा होईल.

  • कोर्ट-कचेर्‍यातील प्रकरणांमुळे त्रास होत असेल तर शनिवारी पिंपळाची 11 पाने खावीत. तसेच त्याचा हार करा आणि तो शनिदेवाला अर्पण करा. पुष्पहार अर्पण करताना 'ओम श्रीं शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा जप करावा.

  • वैवाहिक जीवनात समस्या वाढत असतील, त्या दूर करण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ काळे तीळ अर्पण करा. यानंतर पिंपळाच्या मुळाला पाणी अर्पण करावे.

  • शनिवारी पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालताना कच्च्या कापसाचा धागा सात वेळा गुंडाळावा. या दरम्यान शनिदेवाचे ध्यान करावे. या उपायाने जीवनात प्रगती होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com