Hair Dandruff: अशी मिळवा केसांतील कोंड्यापासून सुटका

Hair Dandruff: मालासेझिया नावाच्या यीस्टची जास्त वाढ, हेअर स्प्रेचा वापर, हेअर जेल किंवा केस कर्लर्स, केमिकलचा सतत आणि प्रमाणापेक्षा जास्त वापर या गोष्टींमुळेदेखील केसात कोंड्याचे प्रमाण वाढते.
Dandruff
Dandruff Dainik Gomantak
Published on
Updated on

Hair Dandruff: आपले सौंदर्य केसांमुळे खुलते असे अनेकदा आपल्या कानावर पडते. आपले केस निरोगी असणे महत्वाचे असते. मात्र अलिकडे बदललेल्या राहणीमानात म्हणजेच योग्य आहार नसणे, फास्ट फुडचा जास्त वापर यामुळे केसांवर वाईट परिणाम होतो.

वाढत्या प्रदूषणाचादेखील केसांवर परिणाम होतो. या सगळ्यामुळे केस गळण्याची समस्या वाढीस लागते. या समस्याबरोबरच केसामध्ये कोंड्याची समस्या अनेकांना त्रास देते. काहीजणांना थंडीच्या दिवसात या समस्येचा सामना कराना लागतो तर काहींना या कायमच या समस्येचा सामना करावा लागतो.

अनेकांना वाटते तेल लावल्याने केसातील कोंडा कमी होतो. मात्र यामध्ये किती तथ्य आहे? तज्ञांनी दिलेल्या माहीतीनुसार, प्रमाणापेक्षा जास्त तेल लावल्याने तुमच्या केसातील कोंडा कमी होण्यापेक्षा जास्त वाढतो.

केसात कोंडा होण्याची कारणे काय आहेत?

केसांमध्ये कोंडा होण्याचे हा केवळ थंड हवामानामुळे होत नाही तर इतरही अनेक कारणे असू शकतात. जसे की तुमचा टाळू सतत तेलकट असणे, जास्त शॅम्पू वापरणे, टाळूमध्ये मृत पेशी तयार होणे, मालासेझिया नावाच्या यीस्टची जास्त वाढ, हेअर स्प्रेचा वापर, हेअर जेल किंवा केस कर्लर्स, केमिकलचा सतत आणि प्रमाणापेक्षा जास्त वापर या गोष्टींमुळेदेखील केसात कोंड्याचे प्रमाण वाढते.

कसे आणि कोणत्या प्रकारचे अँटी-डँड्रफ शॅम्पू वापरावेत?

कोंडा होण्याचे प्रमुख कारण म्हणजे चुकीच्या शॅम्पूचा वापर असतो. शॅम्पू खरेदी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे महत्वाचे ठरते.

1. शाम्पू खरेदी करताना त्यातील घटक वाचा. त्यात २ टक्के केटोकोनाझोल झिंक पायरिथिओन, २ टक्के सेलेनियम सल्फाइड किंवा सायक्लोपिरॉक्स असावे.

Dandruff
Homemade Cake: घरी केक बनवताना 'ही' काळजी नक्की घ्या

2. केस फक्त अँटी-डँड्रफ शॅम्पूने धुवू नका. तुम्ही तळहातात अँटी-डँड्रफ शैम्पू घ्या, त्यात काही थेंब पाणी घाला आणि ते तेल लावल्याप्रमाणे तुमच्या टाळूवर घासून लावा. काही मिनिटानंतर पाण्याने तुमचे केस स्वच्छ करा. त्यावर तुम्ही तुमचे नियमित शॅम्पू कंडिशनर वापरू शकता.

3. तुम्हाला ही प्रक्रिया कायम ठेवावी लागेल कारण 1-2 वॉश पुरेसे नाहीत. तुम्हाला ते आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सुमारे 7 ते 8 आठवडे वापरावे लागेल. इतके प्रयत्न करूनही, जर कोंडा तुमची साथ सोडत नसेल, तर तुम्हाला सोरायसिस, सेबोप्सोरायसिस असे दाहक विकार होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, त्वचारोगतज्ज्ञांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.

याबरोबरच, आपल्या आहाराची काळजी घेणेदेखील महत्वाचे ठरते. आपल्या शरिरात योग्य पोषकघटक आपल्या आहारातून जाणे महत्वाचे ठरते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com